एक्स्प्लोर

टी20 विश्वचषकाचा थरार पाहा एकदम मोफत, समोर आली मोठी अपडेट

वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं मोफत प्रसारन मोबाईलवर पाहाता येणार आहे. त्याबाबत आज मोठी माहिती समोर आली आहे. 

T20 World Cup Live Streaming & Broadcast : आयपीएलचा थरार संपल्यानंतर टी20 विश्वचषकाचा महासंग्राम सुरु होणार आहे. टी20 विश्वचषकाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. चहाच्या टपरीवर, सोशल मीडियावर अन् कट्ट्यावर, ऑफिसात विश्वचषकाच्या चर्चा रंगत आहेत. भारतीय संघाची निवडही करण्यात आली आहे. संघात कोण कोण आहेत, कुणाला संधी द्यायला हवी.. याबाबतच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. या चर्चा सुरु असतानाच विश्वचषकासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं मोफत प्रसारन मोबाईलवर पाहाता येणार आहे. होय, हे खरेय डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर तुम्हाला मोफत विश्वचषक पाहता येणार आहे.

दोन जून पासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये टी20 विश्वचषक रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. पाच जून रोजी भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना होणार आहे. आयर्लंडविरोधात भारत विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात कऱणार आहे. 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धीमध्ये सामना रंगणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ स्टेडियमवर पार पडणार आहे.  डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर तुम्हाला विश्वचषकाचे मोफत सामने पाहता येणार आहेत.  

मोफत पाहा विश्वचषकाचा थरार... 

टी20 विश्वचषकाच्या आधीच भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी20 विश्वचषकात भारतीयांना मोफत पाहता येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपवर विश्वचषकाचा थरार मोफत पाहता येणार आहे. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही. डिज्नी प्लस हॉटस्टार सामन्याचं लाईव्ह प्रसारण पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टी20 विश्वचषक 2024 चा ऑफिशियल ब्रॉडकास्टर आहे. त्याशिवाय या स्पर्धेतील सामन्याचं लाईव्ह प्रसारण डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅप मोफत पाहता येणार आहे.  2023 वनडे विश्वचषकाचेही मोफत प्रसारण करण्यात आले होते. 

रोहित शर्मा भारताचा कर्णधार, अनेक दिग्गजांना संधी - 

मागील काही दिवसांपूर्वी अजित आगरकर यांच्या निवड समितीने टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भऱणा आहे. रोहित शर्माशिवाय विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह यासारख्या अनुभवी खेळाडूंना निवडण्यात आले आहे. त्याशिवाय यशस्वी जायस्वाल, शिवम दुबे, अक्षर पटेल यांच्यासारख्या युवांनाही संधी दिली आहे. संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांना विकेटकीपर म्हणून स्थान दिलेय. केएल राहुल याला डावलण्यात आलेय.हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाचं उपकर्णधारपद सोपवण्यात आलेय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Lok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?Sharad Pawar Vs Ajit Pawar Special Report : Pune Car Accident Special Report : दोघांना चिरडणाऱ्या धनाढ्य बापाच्या मुलाला काही तासात जामीन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
Embed widget