AFG vs SA: अफगाणिस्तानने लज्जास्पद विक्रम नोंदवला, युगांडा अन् पापुआ न्यू गिनीसोबत केली बरोबरी
T20 World Cup 2024 South Africa vs Afghanistan: टी20 वर्ल्ड कप 2024 चा पहिला सेमीफायनल अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे.
T20 World Cup 2024 South Africa vs Afghanistan: टी-20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024) पहिला सेमीफायनल अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर हा सामना सुरू आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाण संघाचा हा निर्णय त्यांना महागात पडला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पॉवर प्लेमध्ये झटपट विकेट गमावून लाजिरवाणा विक्रम केला.
पॉवर प्लेमध्ये अफगाणिस्तानने 5 विकेट्स गमावल्या. या विश्वचषकात आतापर्यंत युगांडा आणि पापुआ न्यू गिनीसारख्या छोट्या संघांनी पॉवर प्लेमध्ये 5-5 विकेट्स गमावल्या होत्या. आता या यादीत अफगाणिस्तानचा संघही सामील झाला आहे. पॉवर प्लेनंतर म्हणजेच 6 षटकांत अफगाणिस्तानची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा होती. यासह अफगाणिस्तान टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पॉवर प्लेमध्ये 5 विकेट्स गमावणारा पहिला संघ ठरला आहे. रहमानउल्ला गुरबाज (00), गुलबदिन नायब (09), इब्राहिम झद्रान (02), मोहम्मद नबी (00) आणि नांगेयालिया खरोटे (02) यांच्या रूपाने अफगाणिस्तानच्या संघाने पॉवर प्लेमध्ये पाच गडी गमावले.
पॉवरमध्ये 5 विकेट गमावणारे संघ (T20 विश्वचषक 2024)
5 विकेट्स - पापुआ न्यू गिनी विरुद्ध अफगाणिस्तान, तारुबा
5 विकेट्स - युगांडा विरुद्ध वेस्ट इंडिज, प्रोविडन्स
5 विकेट्स - युगांडा विरुद्ध अफगाणिस्तान, प्रोव्हिडन्स
5 विकेट - आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान, लॉडरहिल
5 विकेट - अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारुबा (उपांत्य फेरी).
अफगाणिस्तानचा डाव कसा राहिला?
उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तानकडून सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज शून्य धावावर बाद झाला. तर इब्राहिम झदरनने 5 चेंडूत 2 धावा केल्या. गुलबदिन नईबने 9, अजमतुल्ला उमरझाई 10, मोहम्मद नबी 0, नांगेलिया खरोटे 2, करीम जनात 8, राशिद खान 8, नूर अहमद 0, नवीन उल-हक 2 आणि फजलहक फारुकीने 2 धावा केल्या.
HIGHEST SCORE OF AFGHANISTAN IS "EXTRAS" IN SEMIS 🤯 pic.twitter.com/Ndp3aaWXBH
— Johns. (@CricCrazyJohns) June 27, 2024
अफगाणिस्तानने शानदार खेळ करत गाठली उपांत्य फेरी
अफगाणिस्तानने चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मात्र उपांत्य फेरीत संघाला ती कामगिरी कायम ठेवता आली नाही. राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजमधील चारपैकी तीन सामने जिंकले होते. संघाने युगांडा, न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनीविरुद्ध तीन सामने जिंकले. संघाला शेवटचा पराभव वेस्ट इंडिजविरुद्धच्या गटात झाला. यानंतर अफगाणिस्तानने सुपर-8मध्ये भारताविरुद्ध पराभवाची सुरुवात केली. मात्र, त्यानंतर संघाने पुढील दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.