(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला; अमेरिका, अफगाणिस्तानही आघाडीवर
T20 World Cup 2024: काल झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशचा 4 धावांनी पराभव केला होता.
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक संघ विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. याचदरम्यान दक्षिण अफ्रिकेचा संघ सुपर 8 च्या फेरीसाठी पात्र ठरला आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा दक्षिण अफ्रिकेचा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान, तीन मोठे संघ स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता आहे. यामध्ये पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंडचा समावेश आहे.
काल झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशचा 4 धावांनी पराभव केला होता. या विजयासह ग्रुप डीच्या गुणतालिकेत 6 गुणांसह दक्षिण अफ्रिका पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण अफ्रिकेने 3 सामन्यात 3 विजय मिळवले आहेत. तर बांगलादेशचा संघ 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशने आतापर्यंत दोन सामने खेळले असून एका सामन्यात विजय, तर दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशने टी-20 विश्वचषक 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला. नासाऊ कौंटी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 4 धावांनी विजय मिळवला. फलंदाजीसाठी अवघड असलेल्या विकेटवर प्रथम खेळताना दक्षिण आफ्रिकेने 113 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 7 गडी गमावून 109 धावाच करू शकला.
The Proteas lead the way in Group D 🇿🇦#T20WorldCup pic.twitter.com/zh1gKZT101
— T20 World Cup (@T20WorldCup) June 11, 2024
कागिसो रबाडाच्या षटकाने सामन्याचे चित्र फिरवले-
वास्तविक, बांगलादेशला शेवटच्या 3 षटकात विजयासाठी 20 धावांची गरज होती. पण 18व्या षटकात कागिसो रबाडा गोलंदाजी करायला आला, ज्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर 37 धावांवर असलेला फलंदाज तौहीदला बाद केले, तसेच या षटकात फक्त दोन धावा दिल्या. त्यामुळे बांगलादेशी फलंदाजांवर दबाव आला आणि मोठे फटके खेळण्याच्या नादात बांगलादेशचे फलंदाज झटपट बाद झाले.
अमेरिका आणि अफगाणिस्तान सुपर 8मध्ये प्रवेश करणार-
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अ गटाबद्दल बोलायचे झाल्यास तर यजमान अमेरिकेचा संघ खूप मजबूत स्थितीत असल्याचे दिसते. या संघाने 2 विजय नोंदवून 4 गुण मिळवले आहेत. जर पुढील 2 पैकी एक सामना अमेरिकेने जिंकला आणि कॅनडाला एक पराभव पत्करावा लागला तर अमेरिका सुपर-8 साठी पात्र होईल. चांगल्या नेट रन-रेटमुळे, अमेरिका 4 गुणांसह पुढील फेरीत जाऊ शकते. दुसरीकडे, क गटात, अफगाणिस्तान सध्या सुपर-8 मध्ये जाण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तानने पुढील दोन सामन्यांपैकी एकही सामना जिंकला तर त्याचे सुपर-8मधील स्थान जवळपास निश्चित होईल.