एक्स्प्लोर

Ajit Pawar in Beed: तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य

Beed News: यावेळी अजित पवारांनी खोट्या विहिरी दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार आणि पीकविमा घोटाळ्यासंदर्भात भाष्य केले. हे सर्व उर्वरित महाराष्ट्रा चालते, बीड जिल्ह्यात नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.

बीड: बीड जिल्ह्यात जेवढी नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होईल. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले पाहिजेत तर उद्या उद्योगपती या भागात गुंतवणूक करतील. तुमच्याकडे पवनचक्की, सौरउर्जेचे काही प्रकल्प येत आहेत. या उद्योगपतींकडून खंडणी मागणाऱ्यांना आणि त्यांचा रस्ता अडवणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. तीन ते चारपेक्षा अधिकवेळा गुन्हेगारी कृत्यात आढळून आल्यास संबंधितांवर मकोका लावला जाईल, असा इशारा अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला. अजित पवार यांनी बीडच्या (Beed News) पालकमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर गुरुवारी ते पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये आले आहेत. या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात रोखठोख भाषण करताना पक्षात आणि बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि चुकीची कृत्यं खपवून घेतली जाणार नाहीत, असा थेट इशारा दिला.

तुम्ही निवडणुकीत किती पैसे खर्च करता मग आपल्या भागातील विकासकामांसाठी तशी भावना तुमच्या मनात का नाही? विकासकामे करताना आपल्या भागाबद्दल तुमच्या मनात आपलेपणा का नाही? आता सत्ता आल्यानंतर अनेक हौशे-गवशे येऊन मला भेटतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला हे लोक दुसऱ्याच पक्षात होते. मात्र, आता येऊन सांगत आहेत की, दादा मी तुमच्यासोबतच आहे. हे असं चालणार नाही. मी काही दिवस तुमचं वागणं-बोलणं बघेन. प्रत्येक ठिकाणी सरड्यासारखे रंग बदलणारी जमात असते, ती माझ्या पक्षातही आहे. हे लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. पण आता तसलं चालणार नाही, हे मी सांगतो. उद्या परत कोणी माझ्याकडे आलं, एवढ्यावेळेला पांघरुण घाला, असे म्हणतील. पण माझं पांघरुण फाटून गेलंय. एवढ्यावेळेस तुम्हाला पदरात घेऊन आता माझा पदरच उरलेला नाही. त्यामुळे सर्व नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्यप्रकारे वागण्याच्या सूचना द्याव्यात. तुम्ही चांगलं वागलात तर मी तुमच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी करेन. पण चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात विकासकामे करताना पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा केली जाईल. सगळ्यांनी स्वच्छ प्रतिमा ठेवा. लोकं बोलली पाहिजेत, हे लोक खरंच व्यवस्थित पद्धतीने काम करत आहेत. आपल्याला कोणाचा अवमान करायचा नाही. पण विकासकामे करताना फक्त पुढाऱ्यांना विचारुन होत नाही. जनतेशी आणि समाजाशी संबंध असणाऱ्या लोकांना विचारले पाहिजे, आपल्या भागातील साहित्यिक, विचारवंत आणि पत्रकारांचे म्हणणे लक्षात घेतले पाहिजे.  मी काम करताना कोणताही भेदभाव करणार नाही. मात्र, इतरांनी तो केला तर मी खपवून घ्यायला साधूसंत नाही. तुम्ही दुटप्पी वागणार असाल तर मी काम करणार नाही. मी सरळमार्गी आहे, सगळ्यांना मदत करेन. आम्ही इकडे विटू-दांडू, गोट्या किंवा पतंग खेळायला आलेलो नाही, आम्ही इकडे काम करायला आलेलो आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा

अजित पवारांनी बीडमध्ये सगळ्यांची खरडपट्टी काढली, गुन्हेगारांना इशारा; धडाकेबाज भाषणाची जोरदार चर्चा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
Embed widget