एक्स्प्लोर

चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच, अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच, DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा

DeepSeek : चीनमध्ये निर्मित DeepSeek एआयमुळं अमेरिकन टेक कंपन्यांना धक्का बसला होता. चीनच्या आणखी एका कंपनीनं एआय लाँच केलं आहे. 

नवी दिल्ली : चीनमधील कंपनी अलीबाबानं (Alibaba) त्यांच्या एआय तंत्रज्ञानाचं नवं मॉडेल लाँच केलं आहे. अलीबाबानं लाँच केलेल्या एआय मॉडेलचं नाव क्वेन 2.5 मॅक्स (Qwen 2.5 Max) असं आहे. यासोबतचं कंपनीनं डीपसीक एआय (DeepSeek AI), ओपन एआयचं जीपीटी 4ओ आणि मेटाच्या लामा या पेक्षा नव्यानं लाँच केलेलं एआय मॉडेल प्रभावी असल्याचा दावा केला आहे. 

चीनची टेक कंपनी अलीबाबानं प्रसिद्धीपत्रक जारी करत हा दावा केल आहे. क्वेन 2.5- मॅक्स हे चांगली कामगिरी करतेय. सध्या उपलब्ध असलेल्या जीपीटी-4ओ, डीपीसीक-व्ही 3 आणि लामा-3.1-405बी पेक्षा अधिक प्रभावी असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. मेटा आणि ओपन एआयच्या ओपन सोर्स मॉडेल पेक्षा त्यांचं मॉडेल प्रभावी असल्याचं अलीबाबानं म्हटलं आहे. 

डीपसीकच्या एआयच्या लाँचिंगनंतर अमेरिकेतील टेक कंपन्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांचं बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात घसरल्यानं आर्थिक फटका बसला होता. डीपसीकनं एआयमध्ये पाऊल ठेवताच जगभरातील एआयचं जागतिक चित्र बदलून गेलं होतं. डीपसीकनं 10 जानेवारीला लाँच केलेला एआय असिस्टंट डीपसीक-व्ही 3 आणि 20 जानेवारीला लाँच केलेल्या आर 1 मुळं अमेरिकन टेक कंपन्यांना धक्का बसला होता. 

ओपन एआयच्या जीपीटी-4ओ पेक्षा डीपसीक-व्ही 3 चांगलं असून किफायतशीर असल्याचा दावा करण्यात आला होता. डीपसीकची जगभर चर्चा सुरु असताना अलीबाबा कंपनींन क्वेन2.5 मॅक्स एआय मॉडेल लाँच केलं आहे.  

अलीबाबाचं कामकाज ज्या शहरातून चालतं त्या हंगझोऊ या शहरात गेल्या 20 महिन्यापूर्वी डीपसीक कंपनीची स्थापना झाली होती. सध्या एआय क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातंय. कमी किमतीत चांगल्या कामगिरी करत असल्यानं डीपसीककडे जगभरातील टेक प्रेमींचं लक्ष वेधलं गेलं. डीपसीकची  जगभर चर्चा असताना चीनच्या कंपन्यांकडून त्यांना आव्हान दिलं जात आहे. अलीबाबा, टेन्सेन्ट, बैडू या कंपन्यां देखील स्पर्धेत उतरल्या आहेत. 

सध्या एआयच्या किमतीवरुन सुरु असलेल्या दराच्या स्पर्धेत कंपन्या बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्यासाठ  कमी दरात सेवा उपलब्द करुन देत आहेत. 

डीपसीकनं गेल्या वर्षी V2 मॉडेल लाँच केल्यानं तर चीनमध्ये एआय मार्केटवरुन किंमत युद्ध पेटलं होतं. डीपसीकच्या मॉडेलच्या वापरासाठी 1 यूआन म्हणजेच भारतीय 11 रुपये शुल्क द्यावं लागतं होतं. जे इतर स्पर्धक कंपन्यांच्या एआय मॉडेलपेक्षा किफायतशीर होतं. त्यामुळं अलीबाबाला त्यांच्या एआय मॉडेलच्या किंमतीत 97 टक्क्यांपर्यंत कपात करावी लागली.  आर्टिफिशअल इंटेलिजन्स क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेमुळं या क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना आता त्यांच्या धोरणात बदल करावा लागेल.

इतर बातम्या : 

चीनच्या DeepSeek मुळे शेअर मार्केटमध्ये हाहा:कार, एका कंपनीचे 600 अब्ज डॉलर बुडले; भारतातही कोट्यवधी पाण्यात!

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget