(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hasaranga Hattrick in T20 WC:: श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाची ऐतिहासिक कामगिरी, टी-20 विश्वचषकात हॅट्रिक घेऊन रचला विक्रम
Hasaranga Hattrick in T20 WC: याआधी ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली (2007, बांगलादेशविरुद्ध) आणि आयर्लंडचा कर्टिस कॅम्पफर (2021, नेदरलँडविरुद्ध) हॅट्रिक घेतली होती.
Hasaranga Hattrick in T20 WC: टी- 20 विश्वचषकातील सामने जसजसे पुढे जात आहेत. तसतसे नवनवे विक्रम प्रस्थापित होताना दिसत आहेत. यातच श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज (30 ऑक्टोबर) शारजाह क्रिकेट स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगाने हॅट्रिक घेऊन इतिहास रचला आहे. श्रीलंकेसाठी अशी कामगिरी करणारा तो पहिला फिरकीपटू गोलंदाज ठरला आहे. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो श्रीलंकेचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
वानिंदूने 15व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर एडन मार्करामला (19) आऊट केले. त्यानंतर आठराव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आल्यावर पहिल्याच बॉलवर त्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बाऊमाचा विकेट्स घेतला. तर, दुसऱ्या बॉलवर ड्वीन प्रिटोरियसला शून्यावर बाद करून हॅट्रिक घेतली. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. या सामन्यात श्रीलंकेला 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्रिक घेणारा तो पहिला फिरकीपटू ठरला आहे. याआधी, ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली (2007, बांगलादेशविरुद्ध) आणि आयर्लंडचा कर्टिस कॅम्पफर (2021, नेदरलँडविरुद्ध) हॅट्रिक घेतली होती.
टी-20 विश्वचषकातील सुपर-12 फेरीत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 4 विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत. तर श्रीलंकेचे पुढची वाटचाल कठीण झाली आहे. 2014 मध्ये श्रीलंकेने टी-20 विश्वचषक जिंकला होता. मात्र, गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर संघाची कामगिरी चांगली नाही.
संबंधित बातम्या-