SA vs SL: रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर चार गडी राखून विजय
T20 WC 2021, SA vs SL: प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने 143 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 6 गडी गमावून लक्ष्य गाठले.
![SA vs SL: रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर चार गडी राखून विजय SA vs SL South Africa beat Sri Lanka by 4 wickets in a thrilling match Temba Bavuma played captaincy innings SA vs SL: रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर चार गडी राखून विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/30/088fc6c8ef64b22ef0741ba4f043c815_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
T20 World Cup 2021: शनिवारी ICC T20 विश्वचषक (ICC T20 WC) मध्ये शारजाह क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने (SA) श्रीलंकेचा (SL) 4 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका संघाचा हा दुसरा विजय आहे. या पराभवामुळे श्रीलंका संघाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग खडतर झाला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 10 गडी गमावून 142 धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात आफ्रिकन संघाने 19.5 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने सर्वाधिक 46 धावा केल्या. मात्र, 13 चेंडूत 23 धावा करणारा डेव्हिड मिलर आणि 7 चेंडूत 13 धावा करणारा कागिसो रबाडा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाने 3 बळी घेतले.
पथुम निसांकाची 72 धावांची खेळी
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाने जबरदस्त सुरुवात केली आणि पॉवरप्लेमध्ये एक विकेट गमावून 40 धावा केल्या. कुसल परेरा (7) धाव केल्यानंतर नॉर्टजेच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. पॉवरप्लेनंतर पथुम निसांका आणि चरित अस्लंका यांच्यात 30 चेंडूत 41 धावांची भागीदारी झाली. दरम्यान, अस्लंका 14 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 21 धावा करून बाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या भानुका राजपक्षे (0) याने लवकरच शम्सीला आपली विकेट दिली. यानंतर निसांकासह अविष्का फर्नांडोने डाव पुढे नेला. त्यानंतर फर्नांडो (3) शम्सीच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
काही वेळाने हसरंगा (4) चार धावांवर बाद झाला. संघाला पुढे नेत निसांका 58 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 72 धावा करून बाद झाला. दासून शनाका (11), चमिका करुणारत्ने (5), दुष्मंथा चमीरा (3) आणि महेश तिक्षाना (7) यांनी संघाची धावसंख्या 142 धावांपर्यंत पोहोचवली. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सी आणि ड्वेन प्रिटोरियसने प्रत्येकी तीन बळी घेतले, तर श्रीलंकेकडून एनरिक नोर्कियाने दोन बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)