Solapur vidhansabha results 2024 : सोलापुरात जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी; 11 मतदारसंघात कुठं कोण जिंकलं
सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी, माळशिरस, पंढरपूर, सांगोला,मोहोळ, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर दक्षिण, सोलापूर मध्य आणि सोलापूर उत्तर या 11 मतदारसंघात लढत आहे.
सोलापूर : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचा निकाल हाती येत असून सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघातील प्रमुख लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांपैकी, माढा, करमाळा, पंढरपूर, बार्शी, माळशिरस, सोलापूर मध्य, सोलापूर (Solapur) दक्षिण या मतदारसंघात चुरशीच्या लढती असून येथील निकालांचेही अपडेट हाती येत आहेत. त्यानुसार, कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती येथे देण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी, माळशिरस, पंढरपूर, सांगोला,मोहोळ, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर दक्षिण, सोलापूर मध्य आणि सोलापूर उत्तर या 11 मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच प्रमुख लढत होत आहे. दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मनसेनं दिलीप धोत्रेंना मैदानात उतरवण्यात आलं आहे. तर, करमाळ्यातून संजय शिंदे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा. राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर
सोलापूर जिल्ह्यात विजयी उमेदवारांची यादी
1. माढा - अभिजीत पाटील
2. करमाळा - नारायण पाटील
3. पंढरपूर-मंगळवेढा - समाधान अवताडे
4. सांगोला - बाबासाहेब देशमुख
5. माळशिरस - उत्तम जानकर
6. मोहोळ - राजू खरे
7. बार्शी - दिलीप सोपल
8. अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी
9. सोलापूर मध्य - देवेंद्र कोठे
10. सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
11. सोलापूर उत्तर - विजयकुमार देशमुख आघाडीवर
बार्शीसह 11 मतदारसंघात चुरस, कोण कोणाविरुद्ध भिडलं
1) अक्कलकोट
भाजप - सचिन कल्याणशेट्टी
vs काँग्रेस - सिद्धाराम म्हेत्रे
2) सोलापूर उत्तर
भाजप - विजयकुमार देशमुख
vs राष्ट्रवादी (शप) - महेश कोठे
3) सोलापूर दक्षिण
भाजप - सुभाष देशमुख
vs शिवसेना (उबाठा) - अमर पाटील
vs अपक्ष - धर्मराज काडादी
4) सोलापूर मध्य
भाजप - देवेंद्र कोठे
Vs - Mim - फारुख शाब्दि
vs - CPM - नरसय्या आडम
vs चेतन नरोटे (काँग्रेस)
5) मोहोळ
राष्ट्रवादी(अप) - यशवंत माने
vs राष्ट्रवादी (शप) -राजू खरे
अपक्ष - संजय क्षीरसागर
6) बार्शी
शिवसेना (उबाठा) - दिलीप सोपल
vs शिवसेना (शिंदे) - राजेंद्र राऊत
7) माढा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - अभिजीत पाटील
Vs - मिनल साठे (अजित पवार) राष्ट्रवादी
Vs - रणजीतसिंह शिंदे (अपक्ष)
8) सांगोला
शिवसेना (शिंदे) - शहाजी बापू पाटील
vs शिवसेना (उबाठा) - दीपक आबा साळुंखे
vs शेकाप - बाबासाहेब देशमुख
9) माळशिरस
राष्ट्रवादी (शप) - उत्तम जानकर
vs राम सातपुते (भाजपा)
10) करमाळा
राष्ट्रवादी (शप) - नारायण आबा पाटील
vs दिग्विजय बागल (शिवसेना)
11) पंढरपूर-मंगळवेढा
भाजप - समाधान अवताडे
vs काँग्रेस - भगीरथ भालके
सोलापूर जिल्ह्यात 65.41 टक्के मतदान, 11 मतदारसंघातील टक्केवारी
करमाळा - येथील मतदारसंघात 70.54 टक्के मतदान झाले असून 116175 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर 97090 महिलांनी हक्क बजावला.
माढा - येथील मतदारसंघात 69.26 टक्के मतदान झाले. त्यामध्ये, 124313 पुरुष मतदारांनी हक्क बजावला. तर, 1,01,595 महिलांनी मतदान केले.
बार्शी - येथील मतदारसंघात 72.39 टक्के मतदान झाले. त्यामध्ये, 117009 पुरुष मतदारांनी तर 104437 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
मोहोळ - येथील मतदारसंघात 65.62 टक्के मतदान झाले. त्यामध्ये, 111229 पुरुष मतदारांना हक्क बजावला. तर, 89228 महिलांनी मतदान केले.
सांगोला - येथील मतदारसंघात 72.67 टक्के मतदान झाले. त्यामध्ये, 114007 पुरुष मतदारांनी हक्क बजावला. तर, 99,664 महिला मतदारांनी मतदान केले.
शहर उत्तर - येथील मतदारसंघात 52.45 टक्के मतदान झाले असून 80843 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 70402 महिला मतदारांनी मतदान केले.
शहर मध्य - मतदारसंघात 55.47 टक्के मतदार झाले असून 87040 पुरुष तर 80525 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अक्कलकोट - मतदारसंघात 61.18 टक्के मतदान झाले असून 113960 पुरुष मतदारांनी तर 97756 महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. इतरमध्ये 3 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
पंढरपूर - येथील मतदारसंघात 71.23 टक्के मतदान झाले. त्यामध्ये, 124768 पुरुष आणि 112857 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सोलापूर दक्षिण - येथील मतदारसंघात टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये, 161382 मतदारांना हक्क बजावला. त्यामध्ये, 89134 पुरुष तर, 72247 महिला मतदारांनी हक्क बजावला. तसेच, 1 इतर मतदान झाले
माळशिरस - येथील मतदारसंघात 66.77 टक्के मतदान झाले असून माळशिरस (अ. जा.) विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते 12 दरम्यान मतदानाचा वेग कमी होता. मतदारसंघात एकूण मतदान 2,13,836 मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यामध्ये, 115997 पुरुष आणि 97835 महिला मतदारांना हक्क बजावला. तर, इतरमध्ये 4 मतदान झाले.
हेही वाचा
सोलापुरात 65.41 टक्के मतदान, वाढीव मतदानाचा कौल कुणाला; जिल्ह्यात कोणाला किती जागा?