एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला कल हाती आला आहे.

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काही तासांमध्ये मतमोजणीचे कल काय येणार, यावर निकालाची दिशा ठरेल. त्यामुळे सुरुवातीच्या दोन तासांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कोण सरस ठरणार, याचा अंदाज येऊ शकतो. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम पोस्टल बॅलेटसद्वारे आलेल्या मतांची मोजणी सुरु करण्यात आली आहे.  लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पोस्टल मते निर्णायक ठरली होती. या मतदारसंघात पोस्टल मतांमुळे ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर अवघ्या 48 मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे पोस्टल मते महत्त्वाची मानली जात आहेत. उत्तर सोलापूर मतदारसंघात सर्वप्रथम बॅलेट मतांच्या मोजणीला सुरुवात झाली. 

पोस्टल मतांच्या मोजणीचा पहिला कल भाजपच्या बाजूने गेल्याचे समजते. त्यामुळे महायुतीचे खाते उघडले आहे. पोस्टल मतांच्या मोजणीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपने पोस्टल मतमोजणीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता ट्रेंड कायम राहणार का, हे बघावे लागेल. पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम यंत्रांमधील मते मोजण्यास सुरुवात होईल. तेव्हा निकालाचे खरे कल समोर येण्यास सुरुवात होईल. मविआने आतापर्यंत दोन जागांवर आघाडी घेतली आहे. तर महायुतीही दोन जागांवर आघाडीवर आहे.

सुरुवातीच्या कलानुसार नंदूरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित आघाडीवर असल्याचे समजते. तर साकोलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आघाडीवर असल्याची माहिती आहे. बारामतीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार का, हे बघावे लागेल. जामनेरमधून भाजपच्या गिरीश महाजन यांनी आघाडी घेतली आहे. आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील आघाडीवर आहेत. अचलपूरमधून बच्चू कडू आघाडीवर आहेत. शरद पवार गटाच्या राणी लंकेही आघाडीवर आहेत. तर जळगावमधून भाजपच्या संजय कुटे यांनी आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे. पोस्टल मतांची मोजणी संपल्यानंतर ईव्हीएम मशिनमधील मतांची मोजणी सुरु होईल तेव्हा ही आघाडी-पिछाडी कायम राहणार का, हे बघावे लागेल.

आणखी वाचा

Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: महाराष्ट्राची धाकधूक वाढली; पोस्टल मतमोजणीला सुरुवात, पहिला कल भाजपच्या बाजूनं, तर दुसरा कल काँग्रेसच्या बाजूनं

महत्त्वाच्या बातम्या

'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Embed widget