(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली असून सुरुवातीच्या कलात भाजपने बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे.
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासाठी आज फार महत्त्वाच्या दिवस आहे, कारण राज्याची सत्ता नेमकी कुणाच्या हातात जाणार, हे आज समजणार आहे. महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या दिवशी उमेदवारांचे भवितव्य बंद झालेल्या मतपेट्या उघडल्या असून मत मोजणी सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या लढाईत कोण जिंकणार याकडे लक्ष लागलं आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्या मतदारसंघात झेंडा रोवणार हे पाहण्याचीही उत्सुकता लागली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात भाजपने बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे.
सुरुवातीच्या कलात भाजपची बाजी
आज महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल समोर येईल. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होताच भाजपने मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजप वरचढ ठरल्याचं दिसत आहे. भाजपने अनेक मतदारसंघात आघाडी घेतली आहे.
काय आहेत सुरुवातीचे कल?
नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावीत आघाडीवर
जामनेरचे भाजपचे गिरीश महाजन आघाडीवर
पुणे कंटोनमेंट भाजपचे सुनील कांबळे आघाडीवर
परळीतून धनंजय मुंडे आघाडीवर
जळगाव-जामोद संजय कुटे आघाडीवर
काटोलमध्ये भाजपचे चरणसिंह देशमुख आघाडीवर
अचलपूरमधून बच्चू कडू आघाडीवर
येवल्यात छगन भुजबळ आघाडीवर
बारामतीमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर
चंद्रपूर विजय वडेट्टीवार आघाडीवर
उदय सामंत आघाडीवर
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे फक्त राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलं. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंड आण त्यानंतर दोन्हा पक्षांत फूट पडल्यानंतर यंदाची पहिली विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा मतदारही विभागला गेला आहे, अशात मतदारराजा नेमका कुणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यातील जनता कुणाच्या बाजूनं कौल देणार?
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मतमोजणी जाहीर होईल. महाराष्ट्रात पुढील पाच वर्ष कुणाची सत्ता असणार? नवा मुख्यमंत्री कोण असणार? मतदारराजा कुणाच्या बाजूनं कौल देणार? हे आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल. यंदाची निवडणुकीत फार अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे, त्यामुळे याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा...