AUS vs SA WTC Final 2025 : फायनल सामन्यात टेम्बा बावुमाने जिंकली नाणेफेक! सामना ड्रॉ राहिला तर कोण जिंकणार ऑस्ट्रेलिया की दक्षिण आफ्रिका? जाणून घ्या समीकरण
World Test Championship Final Australia vs South Africa : गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत.

World Test Championship Final Australia vs South Africa : गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघ लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरले आहेत. गेल्या 2 वर्षात शानदार कामगिरी करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेकडे 'चोकर्स'चा टॅग काढून टाकण्याची सुवर्णसंधी आहे. पण, यासाठी त्यांना आयसीसी स्पर्धांमधील दिग्गज ऑस्ट्रेलियाचा किल्ला उध्वस्त करावा लागेल.
The #WTC25 Final starts today 🏆
— ICC (@ICC) June 11, 2025
Who's taking home the mace?
How to watch 📺 https://t.co/oas2Rsdptj pic.twitter.com/hfSjX8HeJE
2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने (Temba Bavuma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणाऱ्या WTC 2025 च्या अंतिम सामन्याबद्दल चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की हा सामना इंग्लंडमध्ये आहे, जिथे हवामानाचा अंदाज लावणे सोपे नाही. अशा परिस्थितीत, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? चला सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...
WTC फायनलसाठी राखीव दिवस आहे की नाही?
आयसीसीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील डब्ल्यूटीसी फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. पण, पंच नियोजित तारखांमध्ये म्हणजेच 11 ते 15 जून दरम्यान सामन्याचा निकाल लागावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. सामना सुरू झाल्यानंतरचा सहावा दिवस 16 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. सामन्यात खराब हवामानामुळे वेळ वाया गेला आणि पाचव्या दिवसाच्या अखेरीस कोणताही निकाल लागला नाही तरच तो वापरला जाईल.
जर डब्ल्यूटीसी फायनल अनिर्णित राहिला तर कोण जिंकणार?
डब्ल्यूटीसी 2025 च्या फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे, परंतु असे असूनही जर सामन्याचा निकाल लागला नाही तर ट्रॉफी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वाटली जाईल. याचा अर्थ असा की दोघेही संयुक्त विजेते असतील.
दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग 11 - South Africa (Playing XI)
एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन (विकेटकीपर), वियान मुल्डर, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग 11 - Australia (Playing XI)
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.
हे ही वाचा -





















