Commonwealth Games 2022 : भारतीय महिलांचा कॉमनवेल्थमधील आज पहिला सामना, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच कधी, कुठे पाहाल?
IND vs AUS : कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेत महिला क्रिकेट सामने पार पडणार असून भारतीय पहिलांचा आज पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये कॉमनवेल्थ गेम्सना (Commonwealth Games 2022) सुरुवात झाली असून आज (29 जुलै) भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिला सामना पार पडणार आहे. भारतासमोर बलाढ्य अशा ऑस्ट्रेलिया संघाचं आव्हान असून या सामन्याकडे सर्व भारतीय क्रिकेट चाहत्याचं लक्ष आहे.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये यंदा महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघ स्पर्धेत सामिल (Indian Women's Cricket Team) झाला आहे. टी20 फॉर्मेटचे सामने यंदा स्पर्धेत खेळवले जाणार असून भारतासह 8 संघ स्पर्धेत सामिल होणार आहेत. तर भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कधी, कुठे पाहू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी आहे सामना?
भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामधील हा सामना आज 29 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना 4.30 वाजता सुरु होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना इंग्लंडच्या बर्मिंगहम येथील प्रसिद्ध एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना सोनी स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामने पाहता येणार असून सोनी लिव्ह या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
कसा आहे भारतीय महिला संघ?
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मांधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), एस. मेघना, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणूका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देवोल.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : भारतीय महिला कॉमनवेल्थ सर करण्यासाठी सज्ज, कसं आहे वेळापत्रक, वाचा सविस्तर!
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार, तर मंधाना उपकर्णधार
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघात महामुकाबला, कधी, कुठे पाहाल सामना?