एक्स्प्लोर

आपला प्रिन्सच अव्वल! शुभमन गिल जगातील नंबर 1 फलंदाज, ICC क्रमवारीत बाबर आझमला टाकलं मागे

टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. गिलनं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकलं आहे.

ICC World Cup, Shubhaman Gill: भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याला जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले आहे. आयसीसीनं (ICC) जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, शुभमन गिल आता वनडे फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आहे. यापूर्वी वनडे फॉरमॅटमध्ये नंबर 1 चा मुकुट पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्या डोक्यावर होता. मात्र, आता शुभमन गिलनं बाबर आझमला मागे टाकत आयसीसी क्रमवारीत नंबर 1 स्थान पटकावलं आहे.

शुभमन गिल गेल्या एका वर्षापासून फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 अशा तिनही फॉरमॅटमध्ये त्यानं चमकदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये शुभमन गिलनं इतकी चांगली कामगिरी केली की, भारतीय संघ व्यवस्थापनाला शिखर धवनसारख्या तेजस्वी खेळाडूकडेही दुर्लक्ष करावं लागलं. गिलनं सातत्यानं केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे अल्पावधीतच टीम इंडियाचा सलामीवीर म्हणून कर्मधार रोहितसह धुरा आपल्या खांद्यावर घेतली. 

बाबर आझमला टाकलं मागे, शुभमन गिल अव्वल 

टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलनं पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत ICC एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या ओपनिंग पार्टनरनं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकलं आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बाबर आझम पहिल्या क्रमांकावर होता. स्टार फलंदाज शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्यामुळे वर्ल्डकपसाठी उशिरा प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याचा उशिरा समावेश करण्यात आला. एकीकडे शुभमन गिलनं जबरदस्त परफॉर्मन्स दिला, तर दुसरीकडे बाबर आझमला एका एका धावेसाठी मोठी कसरत करावी लागत होती. 

भारताच्या तीन फलंदाजांचा टॉप-10 मध्ये समावेश 

विश्वचषकात धावा करणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचाही शुभमन गिलसह टॉप-10 क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे, तर रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर आहे. हे दोघेही ज्या फॉर्मात फलंदाजी करत आहेत, ते पाहता भविष्यात क्रमवारीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. 

पोजिशन  फलंदाज  टीम रेटिंग पॉईंट्स
शुभमन गिल  टीम इंडिया  830
बाबर आजम पाकिस्तान  824
क्विंटन डि कॉक दक्षिण आफ्रिका  771
विराट कोहली  टीम इंडिया  770
डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलिया 743
रोहित शर्मा टीम इंडिया  739
रासी वान डर डुसां  दक्षिण आफ्रिका  730
हॅरी ट्रॅक्टर आयर्लंड  729
हेन्री क्लासेन दक्षिण आफ्रिका  725
डेविड मलान इंग्लंड  704

आता एकदिवसीय क्रमवारीत शुभमल गिलचे 830 गुण झाले आहेत. त्याचवेळी दुसऱ्या स्थानावर असलेल्या बाबर आझमचे 824 गुण आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आहे, ज्याचे 771 गुण आहेत. या तिघांशिवाय विराट कोहलीनेही या विश्वचषकात 500 हून अधिक धावा करून ICC एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत विराट कोहली आता चौथ्या स्थानावर आला आहे.

आयसीसी वनडे क्रमवारीत विराटचे 770 गुण आहेत. याचा अर्थ विराट डी कॉकपेक्षाही मागे नाही आणि काही चांगल्या खेळीनंतर विराट आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत 3 नंबरवरही येऊ शकतो. विराटनंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याचे 743 गुण आहेत. त्याच वेळी, वॉर्नरनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 739 गुणांसह 6 व्या क्रमांकावर आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोलSolapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Embed widget