Shoaib Malik : तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच शोएब मलिकचा भीम पराक्रम; कोहली आणि रोहितला टाकलं मागे
Shoaib Malik New Record : सध्या पाकिस्तानी क्रिकेटर (Pakistani Cricketer) शोएब मलिक तिसऱ्या लग्नाच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अशातच त्याने आपल्या नावे आणखी एक विक्रम नोंदवला आहे.
Shoaib Malik Stats : पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू (Pakistani Cricketer) शोएब मलिक (Shoaib Malik) सध्या तिसऱ्या लग्नामुळे Shoaib Malik Marriage) चर्चेत आहे. पाकिस्तानी ऑलराऊंडर क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद (Sana Javed) हिच्यासोबत निकाह केल्याचं समोर आलं आहे. यामुळे शोएब मलिक सध्या खूप चर्चेत आहे. एकीकडे तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे शोएबने मैदानात पराक्रम केला आहे. पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शोएब मलिकने टी-20 क्रिकेटमध्ये मोठं स्थान मिळवलं आहे. शोएब मलिकने असा विक्रम रचला आहे, जो त्याच्या आधी जगातील फक्त एकच फलंदाज करू शकला आहे.
शोएब मलिकने रचला नवा विक्रम
शनिवारी शोएब मलिकने बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये पुन्हा कमबॅक केलं. शोएबने शनिवारी बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (BPL) फॉर्च्यून बारिशालकडून सामना खेळत क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. बरीशालने रंगपूर रायडर्सविरुद्ध पाच गडी राखून आरामात विजय मिळवला. मात्र, या सामन्यात शोएब मलिकने नवा विक्रम रचला आहे. शोएब मलिकने टी20 क्रिकेटमध्ये 13,000 धावांचा आकडा पार केला आहे.
टी20 मध्ये 13 हजार धावा करणारा पहिला आशियाई
टी20 फॉरमॅटमध्ये 13 हजार धावा करणारा शोएब मलिक पहिला आशियाई क्रिकेटर आहे. याशिवाय टी-20 फॉरमॅटमध्ये 13 हजार धावांचा आकडा गाठणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेलच्या नावावर 449 टी-20 सामन्यांमध्ये 36.73 च्या सरासरीने 14289 धावा आहेत. यानंतर आता या यादीत शोएब मलिक 13,010 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. कायरन पोलार्डने 569 टी-20 सामन्यांमध्ये 31.49 च्या सरासरीने 11242 धावा केल्या आहेत.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- ख्रिस गेल (455 सामने) - 14,562 धावा
- शोएब मलिक (487 सामने) - 13,010 धावा
- कायरन पोलार्ड (568 सामने) - 12,454 धावा
- विराट कोहली (359 सामने) - 11,994 धावा
- एलेक्स हेल्स (424 सामने) - 11,807 धावा
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक विभक्त?
भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या. आता शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत तिसरं लग्न केल्याचं समोर आल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया आणि शोएबने परस्पर संमतीने वेगळे होऊन घटस्फोट घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, सानिया मिर्झाने गेल्या बुधवारी इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामधून हे दोघं विभक्त झाल्याच्या शक्यता वाढल्या होत्या.