एक्स्प्लोर

Shoaib Malik Wedding : सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चा; शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत थाटला संसार

Shoaib Malik Sana Javed : सानिया मिर्झाच्या पतीने (Sania Mirza) पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत दुसरं लग्न केलं आहे. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shoaib Malik Sana Javed Wedding : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत (Sana Javed) तिसरं लग्न केलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत शोएबने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सर्वांना हैराण केलं आहे. दरम्यान शोएबने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत तिसरं लग्न केलं आहे. सोशल मीडियावर सना जावेदसोबतचे लग्नसोहळ्याचे फोटो त्याने शेअर केले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

शोएबने शेअर केले फोटो (Shoaib Malik Shared Photo)

शोएबने सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत छान कॅप्शन लिहिलं आहे. त्याने लिहिलं आहे,"अलहमदुलिल्लाह". शोएबने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. लग्नसोहळ्याच्या फोटोंमध्ये शोएब आणि सना खूपच आनंदी दिसत आहेत. शोएब मलिकचं हे तिसरं तर सना जावेदचं दुसरं लग्न आहे.

कोण आहे सना जावेद? (Who is Sana Javed)

सना जावेद ही लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिने आजवर छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे. 28 वर्षीय सना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. 'ऐ मुश्त-ए-खाक' आणि 'डंक'सह अनेक कार्यक्रमांचा ती भाग आहे. तसेच काही म्युझिक व्हिडीओमध्येदेखील ती दिसून आली आहे. सनाने 2012 मध्ये 'शहर-ए-जात'च्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.

शोएब-सानियाचं बिनसलं? 

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा 2010 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. सानियाला इजहान नावाचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून शोएब आणि सानियाचं बिनसलं असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्याही चर्चा सुरू होत्या. 

सानियाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक रहस्यमय पोस्ट शेअर केली होती. तिने लिहिलं होतं,"लग्न अवघड आहे. घटस्फोटही अवघड आहे. वाढलेलं वजन अवघड बाब आहे. त्याप्रमाणे फिट राहणंदेखील गरजेचं आहे. कर्जबाजारी राहणं अयोग्य आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट सोपी नाही. पण योग्य मार्ग निवडणं तुमच्या हातात आहे". 

संबंधित बातम्या

Sania Mirza Shoaib Malik : सानिया मिर्झा अन् शोएब मलिकच्या घटस्फोटाच्या चर्चा; टेनिस स्टारच्या क्रिप्टिक पोस्टने नेटकरी हैराण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
Embed widget