Shikhar Dhawan Mystery Girl : शिखर धवनला मिळाली लाइफ पार्टनर.... कोण आहे 'ती' मिस्ट्री गर्ल? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण
सध्या शिखर धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे.
Shikhar Dhawan spotted with mystery girl : 2024 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलेला शिखर धवन अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसाठी नवनवीन व्हिडिओ बनवत असतो. सध्या शिखर धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. शिखर नवीन मिस्ट्री गर्लसोबत मुंबई विमानतळावर दिसला. त्यामुळे चाहते धवन आणि नवीन मिस्ट्री गर्लबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा करत आहेत.
गब्बर पुन्हा पडला का प्रेमात?
गब्बरसोबत दिसणारी सुंदरी कोण आहे? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण गब्बर या सौंदर्याच्या प्रेमात पडला असल्याचे सोशल मीडियावर मानले जात आहे. दोघेही एकमेकांशी लग्न करणार आहेत. व्हिडिओमध्ये धवन निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या कार्गोमध्ये दिसत आहे. यावेळी धवनसोबत मिस्ट्री गर्लही दिसत आहे.
We see a mysterious girl with #ShikharDhawan 😍, any guesses where they are heading to?#pinkvilla pic.twitter.com/eerddgOQEk
— Pinkvilla (@pinkvilla) November 4, 2024
शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांचा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घटस्फोट झाला होता. मात्र, आता धवन नव्या मिस्ट्री गर्लसोबत दिसल्याने बरेच चर्चेला रंगली. मात्र, धवनने अद्याप या नात्याबाबत अधिकृत काहीही जाहीर केलेले नाही.
धवनने याच वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. संघात युवा खेळाडूंच्या प्रवेशामुळे धवनला टीम इंडियात संधी मिळत नव्हती, त्यामुळे त्याला निवृत्तीची घोषणा करावी लागली. धवनने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 35 कसोटी सामन्यांमध्ये 40.61 च्या उत्कृष्ट सरासरीने 2315 धावा केल्या आहेत आणि 7 शतके आहेत. त्याने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.11 च्या सरासरीने 6793 धावा केल्या आहेत. 68 टी-20 सामन्यांमध्ये या खेळाडूने 27.92 च्या सरासरीने 1759 धावा केल्या आहेत.
Shikhar Dhawan : शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम#ShikharDhawan #Internationalcricket #ABPMajha pic.twitter.com/XfHcaDdfZW
— ABP माझा (@abpmajhatv) August 24, 2024
हे ही वाचा -
Wasim Akram on India : 'पाकिस्तानही भारताला हरवेल....' माजी कर्णधाराने BCCIच्या जखमेवर चोळले मीठ
KL Rahul Team India : केएल राहुलचे डिमोशन! BCCI ने रातोरात घेतला मोठा निर्णय, आता 'या' संघात खेळणार