एक्स्प्लोर

Sanju Samson : न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत संजू संघात असणार का? इन्स्टाग्राम पोस्टवर सॅमसन म्हणाला...

IND vs SL : भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यानंतर त्याने इन्स्टाग्राम पोस्ट करत आपल्या पुनरागमनाबद्दल माहिती दिली आहे.

Sanju Samson : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर संजू सॅमसनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'ऑल इज वेल, लवकरच भेटू'. संजू सॅमसनची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एकीकडे ऋषभ पंत टीम इंडियाचा भाग नाही. यामुळे संजू सॅमसनला संधी मिळेल असे वाटत होते, पण तोही दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाची चिंता वाढली होती. पण आता संजूच्या या पोस्टमुळे तो लवकरच मैदानात उतरेल अशी आशा आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात संजू सॅमसन प्लेईंग इलेव्हनचा भाग होता, पण दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर पडला आहे. मात्र, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, संजू सॅमसन न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी तंदुरुस्त होणार आहे. त्याचवेळी बीसीसीआयने संजू सॅमसनच्या दुखापतीवर एक निवेदन देखील जारी केले आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, संजू सॅमसन न्यूझीलंड मालिकेपर्यंत दुखापतीतून सावरेल. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना संजू सॅमसनला दुखापत झाली होती. यामुळे यष्टीरक्षक फलंदाजाला संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावे लागले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता. 

View this post on Instagram
 
A post shared by Sanju V Samson (@imsanjusamson)

बीसीसीआय मेडिकल टीम काय म्हणाली?

बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यानंतर मुंबईत संजू सॅमसनच्या दुखापतीचे स्कॅनिंग करण्यात आले. या स्कॅननंतर वैद्यकीय पथकाने संजू सॅमसनला विश्रांतीचा सल्ला दिला. त्याच वेळी, वैद्यकीय पथकाने सांगितले की संजू सॅमसन पुढील 4-6 आठवड्यात दुखापतीतून बरा होईल. विशेष म्हणजे भारतीय संघ टी-20 मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Update : आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?Uddhav Thackeray On Police : कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोलVibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटकChanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update : आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Embed widget