Rishabh Pant Health: ऋषभ पंतच्या गुडघ्याचं होणार ऑपरेशन, एकदिवसीय विश्वचषकालाही मुकावं लागू शकतं
Rishabh Pant : ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्याच्या गुडघा आणि घोट्याची शस्त्रक्रिया होणार असून त्यानंतर तो जवळपास 9 महिने क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Rishabh Pant Health Update : भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishab Pant car accident) कारला अपघात झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान तो कधी यातून रिकव्हर होणार याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. तो आगामी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत संघात पुनरागमन करेल, असं वाटत होतं. पण आता त्याच्या गुडघ्याच्या आणि घोट्याच्या शस्त्रक्रियेबाबत माहिती समोर येत आहे, ज्यामुळे जवळपास नऊ महिने क्रिकेटपासून दूर रहावं लागू शकतं, ज्यामुळे तो विश्वचषकातही खेळू शकणार नाही अशी माहिती समोर येत आहे.
पंतच्या गुडघा आणि घोट्याच्या दुखापतीसाठी पंतवर दुहेरी शस्त्रक्रिया होणार आहे. बुधवारी पंतला बीसीसीआयने डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमधून मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट केले. आता पंतला पुढील शस्त्रक्रियेसाठी लंडनला नेलं जाऊ शकतात. मात्र, तो कधी जाणार याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. पण एक गोष्ट नक्की की या शस्त्रक्रियेनंतर पंत जवळपास 9 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “पंतला डेहराडूनहून मुंबईत आणण्यात आले आहे जेणेकरून त्याच्यावर आणखी चांगले उपचार होतील. त्याला विश्रांतीची गरज होती आणि डेहराडूनमध्ये हे शक्य नव्हते. मुंबईत तो उच्च सुरक्षेत असेल आणि केवळ कुटुंबातील सदस्यच त्याला भेटू शकतील. तो त्याच्या दुखापतीतून बरा होताच, डॉक्टर पुढील माहिती देतील.
नऊ महिने क्रिकेटपासून दूर रहावं लागणार
या बीसीसीआय अधिकाऱ्याने पुढे बोलताना सांगितले, “एकदा डॉक्टरांना वाटले की तो प्रवासासाठी योग्य आहे, तेव्हा त्याला शस्त्रक्रियेसाठी लंडनला पाठवले जाईल. त्याला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप आम्हाला माहीत नाही. सूज कमी झाल्यानंतर डॉ. परडीवाला आणि त्यांची टीम उपचाराचा मार्ग ठरवतील. पंतला गुडघा आणि घोट्याच्या दोन्ही शस्त्रक्रियेची गरज आहे. तरीही तो त्याला जवळपास नऊ महिने बाहेर ठेवेल.” तसंच “सध्या आम्ही त्याच्या पुन्हा मैदानावर येण्याबाबत बोलू इच्छित नाही. सध्या सर्वांचे लक्ष त्याच्या रिकव्हरीकडे आहे. त्याला बरे होऊ द्या. त्यानंतर तो पुनरागमन करेल. याला अजून वेळ आहे जेव्हा तो 100 ठिक होईल, तेव्हा आपण त्याच्या पुनरागमनाबाबत बोलू.'' असंही संबधित अधिकाऱ्याने सांगितलं.
हे देखील वाचा-