Sanju Samson Century : 11 चौकार 8 षटकार; संजू सॅमसने वात पेटवली, बांगलादेशविरुद्ध ठोकलं विक्रमी शतक!
Sanju Samson Century : टीम इंडियाचा स्टार फलंदाज संजू सॅमसनने धमाकेदार शतक झळकावत आपल्या स्फोटक फलंदाजीने बांगलादेशचा धुव्वा उडवला.
Sanju Samson Century Ind vs Ban 3rd T20 : टीम इंडियाचा स्टार फलंदाज संजू सॅमसनने धमाकेदार शतक झळकावत आपल्या स्फोटक फलंदाजीने बांगलादेशचा धुव्वा उडवला. हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात संजू सॅमसनने आपल्या टी-20 कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. अवघ्या 40 चेंडूत शतक झळकावले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावले. या खेळीदरम्यान संजूने बांगलादेशचा फिरकी गोलंदाज रिशाद हुसेनला सर्वाधिक फटकावलं आणि एकाच षटकात सलग 5 षटकार ठोकले.
हैदराबादमध्ये झालेल्या मालिकेतील शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजीला आली आणि त्याचा पुरेपूर फायदा संजू सॅमसनने घेतला. मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरलेल्या संजूने तिसऱ्या सामन्यात असे षटकार आणि चौकार मारले ज्यामुळे राजीव गांधी स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक अचंबित झाले, तर मैदानावर उपस्थित बांगलादेश खेळाडू चकित झाले.
सलग 5 षटकार ठोकले, पहिले शतक झळकावले
सॅमसनने डावाच्या दुसऱ्याच षटकात तस्किन अहमदविरुद्ध सलग 4 चौकार मारले होते. त्यानंतर सातव्या षटकात रिशाद हुसेनने 3 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार खेचून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने हे अर्धशतक अवघ्या 22 चेंडूंमध्ये पूर्ण केले, जे बांगलादेशविरुद्ध भारताकडून या फॉरमॅटमधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. यानंतर संजू आणखीनच खतरनाक बनला आणि रिशाद हुसेन पुन्हा त्याचे टारगेट बनला. 10व्या षटकात ऋषदचा पहिला चेंडू हुकल्यानंतर संजूने सलग 5 चेंडूत 5 षटकार मारून खळबळ उडवून दिली. लवकरच संजूने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक अवघ्या 40 चेंडूत पूर्ण केले.
पण मुस्तफिजुर रहमानने संजू सॅमसनचा डाव संपुष्टात आणला. सॅमसन 47 चेंडूंत 11 चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 111 धावा करून बाद झाला. सॅमसनने अवघ्या 40 चेंडूत शतक झळकावले, जे या फॉरमॅटमधील भारताचे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. सॅमसनने कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत दुसऱ्या विकेटसाठी 173 धावांची भागीदारी केली.
Maiden T20I CENTURY for Sanju Samson! 🥳
— BCCI (@BCCI) October 12, 2024
What an exhilarating knock from the #TeamIndia opener 👏👏
That's the 2nd Fastest T20I century for India after Rohit Sharma 👌👌
Live - https://t.co/ldfcwtHGSC#INDvBAN | @IamSanjuSamson | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/OUleJIEfvp
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयंक यादव.
बांगलादेश : परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्जीद हसन, तौहीद हरदोय, महमुदुल्लाह, मेहदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब.