(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SA20 League Auction : दक्षिण आफ्रिका टी20 लीगचा लिलाव पूर्ण, जोहान्सबर्ग सुपर किंग्सपासून एमआय केपटाऊनपर्यंत असे आहेत 6 संघ?
SAT20 : सोमवारी दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये सहा संघ सहभागी होत आहे. दरम्यान नुकताच या स्पर्धेसाठी लिलाव पार पडला असून सहाही फ्रँचायझीने प्रत्येकी 17-17 खेळाडूंना संघात सामिल केलं आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमधील विविध खेळाडू सहभागी आहेत.
SA20 League Team Squads : पुढील वर्षीपासून दक्षिण आफ्रिका टी20 क्रिकेट लीगसाठी (SA20 League) सुरु होणार आहे. यासाठी सोमवारी केपटाऊन येथे मेगा ऑक्शन पार पडलं. यावेळी 314 खेळाडूंसाठी सहा वेगवेगळ्या फ्रँचायझीनी बोली लावली. यावेळी 6 संघानी एकूण 80 खेळाडूंना संघात सामिल केलं. याआधी प्री-ऑक्शनमध्ये 22 खेळाडूंना या सहा संघानी आपल्यासोबत सामिल केलं होतं. त्यामुळे आता एकूण 17-17 खेळाडूंचे संघ जाहीर झाले असून नेमके सहा संघ कसे आहेत पाहूया...
1. डरबन सुपर जायंट्स (मालक: RPSG स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड)
एकूण खेळाडू: 17 (परदेशी खेळाडू: 6)
फलंदाज: हेनरिक क्लासेन, जॉनसन चार्ल्स (वेस्ट इंडीज), मॅथ्यू ब्रिज्क, क्विंटन डी कॉक
ऑलराऊंडर: ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कीमो पॉल (वेस्ट इंडीज), वियान मुल्डर, क्रिस्टियन जोंकर, जेसन होल्डर (वेस्ट इंडीज), कायल मेयर्स (वेस्टइंडीज)
गोलंदाज: कायल एबॉट, सिमोन हार्मर, जूनियर डाला, दिलशान मदुशंका (श्रीलंका), रीस टॉपली (इंग्लंड), पेनलन सुब्रायन
2. जोहान्सबर्ग सुपर किंग्स (मालक: चेन्नई सुपर किंग्स)
एकूण खेळाडू: 17 (परदेशी खेळाडू: 7)
फलंदाज: फाफ डुप्लेसिस, डोनावन फररियरा, जानेमन मलान, रीजा हेंडरिक्स, हैरी ब्रुक (इंग्लंड), काइनल वॅरीयनी, ल्यूस डू प्लॉय
ऑलराऊंडर: जॉर्ज गार्टन (इंग्लंड), लेविस ग्रेगोरी (इंग्लंड), रोमारियो शेफर्ड (वेस्ट इंडीज)
गोलंदाज: अल्जारी जोसेफ (वेस्ट इंडीज), लिजाड विलियम्स, केलेब सेलेका, नांद्रे बर्गर, मलूसी सोबोतो, महेश तिक्ष्णा (श्रीलंका), गरलँड कोत्जी
3. एमआय केपटाउन (मालक: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड)
एकूण खेळाडू: 17 (परदेशी खेळाडू: 6)
फलंदाज: रासी वॅन डर ड्युसेन, डि वाल्ड ब्रेविस, रियान रिकेलटन, ग्रांट रोलेफ्सन, वेबली मार्शल
ऑलराऊंडर: ओडीयन स्मिथ (वेस्टइंडीज), जॉर्ज लिंडे, डुआन जेन्सन, डिलेना पोटगिटर, राशिद खान (अफगाणिस्तान), लियमा लिव्हिगस्टोन (इंग्लंड), सॅम करन (इंग्लंड)
गोलंदाज: ब्यूरन हेंडरिक्स, ऑली स्टोन (इंग्लंड), वकार सलामखिल (अफगाणिस्तान), जियाद अब्राह्मंस, कागिसो रबाडा
4. पार्ल रॉयल्स (मालक: रॉयल स्पोर्ट्स ग्रुप)
एकूण खेळाडू: 17 (परदेशी: 5)
फलंदाज: जेसन रॉय (इंग्लंड), इयॉन मोर्गन (इंग्लंड), डेन विलास, मिचेल वॉन ब्यूरन, विहान लूबे, जोस बटलर (इंग्लंड), डेविड मिलर
ऑलराऊंडर: फरसिको एडम्स, इमरान मनाक, कोडी युसूफ, इवान जोन्स
गोलंदाज: तबरेज शम्सी, लुंगी एनगिडी, बीजोर्न फॉरट्युन, रेमन सिमंड्स (वेस्टइंडीज), ओबेड मेकॉय (वेस्टइंडीज), कॉर्बिन बोश्च.
5. प्रीटोरिया कॅपिटल्स (मालक: जेएसडब्लू स्पोर्ट्स)
एकूण खेळाडू: 17 (परदेशी खेळाडू: 6)
फलंदाज: रिले रॉसू, फिल साल्ट (इंग्लंड), कुसल मेंडिस (श्रीलंका), विल जॅक्स (इंग्लंड), केमेरॉन डेलपोर्ट, थीयूनिस डी ब्रुइने, मार्को मराइस
गोलंदाज: जोस लिटिल (आयर्लंड), आदिल राशीद (इंग्लंड), शॉन वॉन बर्ग, डारिन डुपाविलन, एनरिक नॉर्ट्जे, माइकल प्रीटोरियस.
6. सनराइजर्स इस्टर्न कॅप (मालक: सन टीव्ही नेटवर्क)
एकूण खेळाडू: 17 (परदेशी खेळाडू: 7)
फलंदाज: ट्रिस्टन स्टब्स, सारेल अर्वी, जॉर्डन कॉक्स (इंग्लंड), एडम रॉसींग्टन (इंग्लंड), मार्क्विज एकरमन, एडन मार्करम
ऑलराऊंडर: मार्को यान्सिन, सिसांदा मंगाला, ब्रिडन कार्स (इंग्लंड), जेजे स्म्ट्स, टॉम अबेल (इंग्लंड), अया गकामाने, रॉफ वान डेर मर्व, जेम्स फुलर (इंग्लंड)
गोलंदाज: मेसन क्रेन (इंग्लंड), जुनैद दावुद, ओटेनिल बार्टमन.
हे देखील वाचा-