(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SAT20 League : दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीगचा ऑक्शन, सनरायजर्सची सीईओ काव्याचे फोटो पुन्हा व्हायरल
Kavya Maran : सनरायजर्स हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारनचे फोटो कायमच आयपीएल दरम्यानही कमालीचे व्हायरल होत असतात. आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीगमध्ये ती सनरायजर्स ईस्टर्न केप संघासाठी खेळाडूंवर बोली लावण्यासाठी आली आहे.
Kavya Maran in South Africa T20 League : दक्षिण आफ्रिका टी20 क्रिकेट लीगसाठी (T20 Cricket League) खेळाडूंचा लिलाव सुरु असून केपटाऊन इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा लिलाव पार पडत आहे. केपटाऊनमध्ये होणाऱ्या या लिलावात 318 खेळाडूंसाठी बोली लावली जात आहे. दरम्यान या बोलीदरम्यान, सनरायझर्स संघाची सीईओ काव्या मारन ही देखील उपस्थित होती. काव्याचे आयपीएल लिलाव तसंच सामन्यादरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते तसेच तिचे दक्षिण आफ्रिकेच्या लिलावादरम्यानचे काव्याचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सनरायझर्स हैद्राबाद संघाची सीईओ काव्या मारन दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीगमध्ये सनरायझर्सची दक्षिण आफ्रिका लीगमधील फ्रेंचायजी सनरायझर्स ईस्टर्न केप संघाकडून लिलावासाठी गेली होती.यावेळी काव्या मारन ऑक्शन टेबलवर दिसून आली. दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीगमध्ये मुंबई इंडियन्स केप टाऊन, डरबन सुपर जायंट्स, जोहान्सबर्ग सुपर किंग्स, पार्ल रॉयल्स, प्रिटोरिया कॅपिटल आणि सनरायझर्स ईस्टर्न केप संघ सहभागी होत आहेत. दक्षिण आफ्रिका टूर्नामेंटचं आयोजन जानेवारी-फेब्रुवारी 2023 मध्ये खेळवली जाणार आहे.
Kavya Maran on the auction table for Sunrisers Eastern Cape. pic.twitter.com/2YUTN3CS8O
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 19, 2022
Teams battle in auction to get the services of 22 year old Tristan Stubbs.#TristanStubbs#SA20Auction#SA20 #INDvAUS pic.twitter.com/NAF4dTxd5N
— Cricket Videos🏏 (@Crickket__Video) September 19, 2022
कोण आहे काव्या मारन?
काव्या मारन ही सनरायझर्स फ्रँचायझीची सीईओ आहे. ती प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन यांची मुलगी असून कलानिधी मारन हे प्रसिद्ध सन ग्रुपचे संस्थापक आहेत. कलानिधी हे विविध दूरचित्रवाणी वाहिन्या, एफएम रेडिओ स्टेशन, डीटीएच सेवा, वर्तमानपत्रे आणि एका फिल्म प्रोडक्शन हाऊसचेही मालक आहेत. काव्या मारन हिला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असल्याने ती आयपीएल दरम्यान सनरायझर्स हैदराबादच्या जवळपास सर्व सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये उपस्थित असते. आपल्या संघाला प्रोत्साहन देखील देताना ती दिसून येते. काव्या मारनचे सामन्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने ती एक सोशल मीडिया सेन्सेशनही झाली आहे.
हे देखील वाचा-