Rohit Sharma Health: नेतृत्वासाठी रोहित शर्मा सज्ज, फिटनेस टेस्ट केली पास
Rohit Sharma Health : सहा फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील एकदिवसीय आणि कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. वेस्ट इंडिज विरोधातील मालिकेत रोहित शर्मा पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.
Rohit Sharma Health : विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर ही धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर आली आहे. दुखापतीमुळे रोहित शर्माने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली असून भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी सज्ज झाला आहे. सहा फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील एकदिवसीय आणि कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. वेस्ट इंडिज विरोधातील मालिकेत रोहित शर्मा पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. बुधवारी भारतीय संघाची निवड होणार आहे.
रोहित शर्माला बंगळुरु येथील एनसीएमध्ये आपली फिटनेस टेस्ट पास करावी लागली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी दुखापतग्रस्त झालेला रोहित शर्मा एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर काम करत होता. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत आहे. पण रोहित शर्माने आज एनसीएमध्ये आपली फिटनेस टेस्ट पास केली आहे. अहमदाबाद आणि कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यासाठी रोहित उपलब्ध असेल.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकामध्ये कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकाही गमावली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर मायदेशात श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघाविरोधात टीम इंडिया दोन हात करणार आहे. भारतामध्ये वेस्ट इंडिज संघाविरोधात तीन सामन्याची एकदिवसीय आणि टी 20 मालिका होणार आहे. नुकतेच या मालिकेचं सुधारित वेळापत्रक बीसीसीआयने जारी केलं आहे. सहा फ्रेबुवारीपासून वेस्ट इंडिजविरोधात एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजविरोधातील सामने दोन शहरात होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअम अहमदाबाद आणि इडन गार्डन कोलकाता या मैदानावर एकदिवसीय आणि टी 20 मालिका होणार आहे. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर न जाणाऱ्या रोहित शर्माचं या मालिकेद्वारे पुनरागमन होणार आहे.
वेस्ट इंडिजचा भारत दौऱ्याचं सुधारित वेळापत्रक
एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता