एक्स्प्लोर

NED vs ENG : इंग्लंडचा तब्बल 232 धावांनी विजय, जोस बटलरसह तिघांची शतकं 

NED vs ENG : इंग्लंड संघाने नेदरलँडवर तब्बल 232 धावांनी विजय मिळवलाय. इंग्लंडने दिलेल्या 498 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ 49.4 षटकांत 266 धावांपर्यंत मजल मारु शकला.

NED vs ENG : इंग्लंड संघाने नेदरलँडवर तब्बल 232 धावांनी विजय मिळवलाय. इंग्लंडने दिलेल्या 498 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ 49.4 षटकांत 266 धावांपर्यंत मजल मारु शकला. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर डेविड विली, सॅम करण आणि रासी तोप्ले यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. डेविड मलानला एक विकेट मिळाली. नेदरलँडकडून स्कॉट एडवर्ड्सने नाबाद 72 धावांची खेळी केली. त्याशिवाय मॅक्सवेल ओ 'डॉव्ड याने अर्धशतकी खेळी केली.

इंग्लंड संघाची कामगिरी (50 षटकांत चार बाद 498) -
जेसन रॉय (1), फिल साल्ट (122), डेविड मलान (125), जोस बटलर (नाबाद 162),  इयॉन मॉर्गन (0), लियाम लिव्हिंगस्टोन (नाबाद 66)

नेदरलँड संघाची कामगिरी -
विक्रमजित सिंह (13), मॅक्सवेल ओ 'डॉव्ड (55), मुसा अहमद (21), टॉम कॉपर (23) बेस डि लीडे (28), स्कॉट एडवर्ड्स (नाबाद 72), लॉगन वेन ब्रीक (6), पीटर सीलार (25), शेन स्नेटर (4), अर्यन दत्त (0), फिलिप बोइस्सेवैन (5)

दरम्यान, डेविड मलान, जोस बटलर आणि फिल साल्ट यांच्या वादळी शतकाच्या बळावर इंग्लंड संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 498 धावांचा डोंगर उभारला. नेदरलँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जेसन रॉय अवघ्या एका धावेंवर माघारी परतला. पहिली विकेट झटपट पडल्यानंतर डेविड मलान आणि फिल साल्ट यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी द्विशतकी भागिदारी केली. दोघांनी तब्बल 223 धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. फिल साल्ट याने 122 धावांची खेळी केली. तर डेविड मलान याने 125 धावांची वादळी खेळी केली. 

जोस बटलरची वादळी खेळी - 
आयपीएलमध्ये तुफानी खेळी करणाऱ्या जोस बटलरने नेदरलँडच्या गोलंदाजांची पिटाई केली. बटलरने अवघ्या 70 चेंडूत 162 धावांचा पाऊस पाडला. या खेळीरम्यान बटलरने तब्बल 14 षटकार आणि सात चौकार लगावले. बटलरशिवाय फिल साल्ट याने 93 चेंडूत 122 तर डेविड मलान याने 109 चेंडूत 125 धावांची खेळी केली. 

लियाम लिव्हिंगस्टोनचं तुफान - 
आयपीएलमध्ये षटकार चौकारांचा पाऊस पाडणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोन यानेही षटकारांचा पाऊस पाडला. लियाम लिव्हिंगस्टोन याने फक्त 22 चेंडूत 66 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान लियामने सहा चौकार आणि सहा षटकारांचा पाऊस पाडला. 

चौकार-षटकारांचा पाऊस - 
इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. 50 षटकात तब्बल 26 षटकार आणि 36 चौकारांचा पाऊस पाडला. सर्वाधिक षटकार जोस बटलरने लगावले. बटलरने तब्बल 14 षटकारांचा पाऊस पाडला. बटलरने 70 चेंडूत 162 तर लियामने 22 चेंडूत 66 धावांचा पाऊस पाडला. 

नेदरलँडची कमकुवत गोलंदाजी - 
नेदरलँडच्या एकाही गोलंदाजाला अचूक टप्प्यावर मारा करता आला नाही. प्रत्येक गोलंदाजाला प्रतिषटक आठ पेक्षा जास्त धावांनी चोप मिळाला. नेदरलँडकडून पिटर सीलार याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. पण त्यासाठी त्याने 9 षटकात 83 धावा खर्च केल्या. नेदरलँडच्या Philippe Boissevain याच्या गोलंदाजीत तर धावांचा पाऊसच पडला. Philippe Boissevain याने 10 षटकांत तब्बल 108 धावा दिल्या. 

महत्त्वाच्या बातम्या

Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Ind vs NZ T20 Series: भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
IND vs WI 1st T20I Score : टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget