एक्स्प्लोर

MS Dhoni : धोनीचं चाहत्याला स्पेशल गिफ्ट! फॅनसोबतचा खास VIDEO व्हायरल

MS Dhoni Signs Fan's BMW : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (MS Dhoni Viral Video) होत आहे.

MS Dhoni Gift to Fan : सध्या एकीकडे टीम इंडिया (Team India) विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) मध्ये शानदार प्रदर्शन करताना दिसत आहे. तर, दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धोनीची फॅन फॉलोईंग (Dhoni Fans) इतकी जास्त आहे, की तो कायम चर्चेत असतो. आता धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (MS Dhoni Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या चाहत्याला खास गिफ्ट देताना दिसत आहे. धोनीनं त्याच्या चाहत्याला दिलेल्या खास गिफ्टचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

धोनीचं चाहत्याला खास गिफ्ट

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने त्याच्या चाहत्याला एक खास भेट दिली आहे. धोनीने रांचीमधील एका चाहत्याला खास ऑटोग्राफ दिलं आहे. खास ऑटोग्राफ यासाठी की, हा ऑटोग्राफ धोनीनं त्याच्या बीएमडबल्यू कारवर दिली आहे. या चाहत्याच्या बीएमडब्ल्यू कारच्या मागच्या सीटवर सही करून धोनीनं चाहत्याला खास गिफ्ट दिलं आहे.. इंस्टाग्राम युजर सुमीत कुमार बजाजने याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी अभिषेक केरकेट्टा नावाच्या व्यक्तीच्या कारवर ऑटोग्राफ देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी ऑटोग्राफसाठी योग्य जागा आणि योग्य पेन निवडताना दिसत आहे.

धोनीचा हा व्हिडीओ व्हायरल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चाहत्यांमध्ये क्रेझ कमी होत नाहीये. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो त्याच्या एका चाहत्याला खास पद्धतीने ऑटोग्राफ देताना दिसत आहे. वास्तविक, व्हिडिओमध्ये तो एका चाहत्याच्या बीएमडब्ल्यू कारवर ऑटोग्राफ देताना दिसत आहे. यासाठी तो पेनची निवड करतानाही दिसत आहे. दरम्यान, 'आता सगळ्यात मोठी अडचण आहे की सेट व्हायचं, सही कशी करायची' असंही तो म्हणताना दिसतोय. 

पाहा धोनीचा व्हायरल व्हिडीओ

धोनीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी त्याचे कार चालवतानाचे काही व्हिडीओ समोर आले होता. त्याशिवाय त्याच्या बाईक राईडचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर, धोनीच्या कार आणि बाईक कलेक्शनचा व्हिडीओ चर्चेत आला होता. धोनीला बाईक आणि कारची खूप आवड आहे. तो अनेक वेळा गाडी चालवतानाही दिसतो.

धोनी पुन्हा एकदा मैदानात दिसणार

आयपीएल 2024 मध्ये धोनी पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. आयपीएल 2023 नंतर धोनी निवृत्ती घेईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती पण, तसं झालं नाही. 2023 मध्ये, त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा चॅम्पियन बनले. 

धोनीच्या चाहत्यांना आयपीएलची प्रतीक्षा

आयपीएल 2023 मध्ये धोनी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त दिसला, पण त्याने खेळ सोडला नाही. आयपीएल संपल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि 2024 च्या आयपीएलसाठी पूर्णपणे तयार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Embed widget