IND vs AUS, Live : अफलातून पद्धतीनं स्टम्प उडवत मोहम्मद शमीनं केलं वॉर्नरला त्रिफळाचीत, VIDEO एकदा पाहाच
Shami bowling : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात सुरु असून भारताने दमदार सुरुवात केल्याचं दिसून येत आहे.
Shami to Warner : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात पहिला कसोटी सामना नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सुरु झाला असून नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान भारताने मात्र अफलातून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकलं. दरम्यान सुरुवातीचे दोन्ही विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतले. यावेळी सिराजनं उस्मान ख्वाजाला पहिलं बाद केलं असलं तरी शमीनं घेतलेली वॉर्नरची विकेट पाहण्याजोगी होती. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर शमीनं वॉर्नरला त्रिफळाचीत केलं. यावेळी शमीनं वॉर्नरचे स्टम्प अशारितीनं उडवले की स्टम्प फारच दूर गेल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बीसीसीआयनं देखील सिराज आणि शमी दोघांनी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांचे विकेट्सचा VIDEO पोस्ट केला आहे.
पाहा VIDEO-
View this post on Instagram
भारताची दमदार सुरुवात
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या पहिल्या डावात करण्याची ऑस्ट्रेलियाची रणनीती होती. पण भारताने अप्रतिम गोलंदाजी करत टी ब्रेकपूर्वीच ऑस्ट्रेलियाचे 8 गडी तंबूत परतवले. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी रवींद्र जाडेजाने केली. त्याने एकूण तीन गडी बाद केले. दुसरीकडे अश्विन, सिराज आणि शमीनं प्रत्येकी एक विकेट घेतली. पण यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेननं 49 धावांची खेळी केली.
कशी आहे भारताची अंतिम 11?
आजच्या सामन्यासाठीची भारताची अंतिम 11 पाहता यात सर्वाच महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादव आणि केएस भरत या दोघांनी संघात पदार्पण केलं आहे. बऱ्याच काळापासून सूर्याच्या पदार्पणाची चाहते वाट पाहत होते. जे अखेर पार पडलं आहे. पण सोबतच कमाल फॉर्मात असणाऱ्या शुभमन गिलला मात्र संघात संधी मिळालेली नाही. केएल राहुल पुन्हा एकदा संघात परतला असून तोच रोहितसोबत सलामीला येणार हे निश्चित झालं आहे. विराच, पुजारा हे मधल्या फळी असून अश्विन, जाडेजा आणि अक्षर हे अष्टपैलू संघात आहेत. तर शमी आणि सिराज वेगवान गोलंदाजीचा अटॅक सांभाळणार आहेत.
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
हे देखील वाचा-