एक्स्प्लोर

IND vs ZIM, 2nd ODI, Head to Head Record : आज भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय सामना, कोणाचं पारडं जड, कसा आहे आजवरचा इतिहास, वाचा सविस्तर

Ind vs Zim : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) संघाला मात दिल्यानंतर आज मालिकाविजयाच्या दृष्टीने भारत दुसरा सामना खेळण्यास सज्ज झाला आहे.

India vs Zimbabwe, ODI Record : भारत-झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु असून भारत पहिला सामना (1st ODI) जिंकत मालिकेत 1-0 च्या आघाडीवर आहे. दरम्यान आता दुसरा सामना खेळवला जाणार असून हा जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेईल. तर झिम्बाब्वे सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने सामना अत्यंत महत्त्वाचा असल्यान या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

भारत- झिम्बाब्वे ODI Head to Head

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि झिम्बाब्वे संघ आतापर्यंत 64 वेळा आमने सामने आले आहेत. यावेळी भारताचं पारडं कमालीचं जड राहिलं असून भारताने या सामन्यांतील 52 सामने जिंकले आहेत. तर, 10 सामने वेस्ट इंडीजने जिंकले आहेत. याशिवाय, दोन सामना अनिर्णित देखील राहिले आहेत. दरम्यान भारताने आताच इंग्लंड आणि वेस्ट इंडीज अशा दोघांना तगडी मात दिली असल्याने आता झिम्बाब्वेलाही भारत मात देण्यास सज्ज झाला आहे. 

भारतीय संघ - केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.

झिम्बाब्वे संघ -  रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.

भारतीय संघात बदल?

पहिल्या वनडेमध्ये भारताने तब्बल 10 विकेट्सनी विजय मिळवला. झिम्बाब्वेचं 190 धावाचं लक्ष भारताच्या गिल आणि धवन जोडीने अनुक्रमे 82 आणि 81 रन करुन पूर्ण केलं. पण असं असतानाही दुसऱ्या सामन्यात केएल राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. कारण केएल राहुल मागील बऱ्याच काळापासून दुखापतीमुळे संघाबाहेर होता. आता तो संघात कर्णधार म्हणून आला असताना आगामी आशिया कपसाठी त्याला सराव म्हणून या मालिकेत अधिक खेळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो सलामीलाच मैदानात उतरु शकतो. याशिवाय राहुल त्रिपाठी यालाही भारतीय संघात आगमन करण्याची संधी दिली जाऊ शकते, ईशान किशनच्या जागी तो खेळू शकतो. 

अशी असू शकते भारताची अंतिम 11

सलामीवीर - केएल राहुल आणि शिखर धवन

मिडिल ऑर्डर फलंदाज - दीपक हुडा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर) आणि ईशान किशन/राहुल त्रिपाठी. 

ऑलराउंडर- अक्षर पटेल

गोलंदाज - कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, दीपक चाहर आणि प्रसिद्ध कृष्णा. 

हे देखील वाचा - 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget