IND vs ZIM, 2nd ODI Live Streaming : शनिवारी रंगणार भारत विरुद्ध झिम्बाब्वे दुसरी ODI, कधी, कुठे पाहाल सामना?
India vs Zimbabwe ODI : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना शनिवारच्या दिवशी रंगणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेटरसिकांमध्ये उत्सुकता आहे.
India vs Zimbabwe Live : भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना (2nd ODI) उद्या अर्थात शनिवारी (20 ऑगस्ट) खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली असल्याने आता भारताला मालिका जिंकण्यांची संधी असून झिम्बाब्वेला मालिकेत बरोबरी मिळवण्याची संघी आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 10 गडी राखून जिंकला. सामन्यात आधी दमदार गोलंदाजीसह नंतर उत्तम अशी फलंदाजी देखील भारताने केली. त्याआधी भारताने इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत मात दिल्यानंतर आता झिम्बाब्वेला मात देण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. तर आजचा हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कधी आहे सामना?
उद्या 20 जुलै ऑगस्ट भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी सामना सामना सुरु होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसंच सोनी लिव्ह (Sony LIV) अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.
झिम्बाब्वेचा संघ:
रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.
हे देखील वाचा-