एक्स्प्लोर

जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होणार?; लवकरच नव्या भूमिकेत दिसणार, ग्रेग बार्कले यांची निवडणुकीतून माघार

ICC Jay Shah: जय शाह हे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सर्वात मोठे दावेदार आहेत, असं सांगण्यात येत आहे.

ICC Jay Shah: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) विद्यमान चेअरमन ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. काल ग्रेग बार्कले यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी आयसीसीच्या आगामी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आयसीसीचे पुढील चेअरमन म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जय शाह यांची जोरदार चर्चा रंगली आहे. 

ग्रेग बार्कले हे नोव्हेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा या पदावर निवडून आल्यानंतर 2022 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी या पदाचे सूत्रे स्वीकारली होती. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले लवकरच अध्यक्ष म्हणून चार वर्षे पूर्ण करतील आणि त्यांचा सध्याचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. म्हणजेच 1 डिसेंबरपासून नवे अध्यक्ष आयसीसीचा पदभार स्वीकारतील आणि या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जय शाह (Jay Shah) आयसीसीच्या (ICC) अध्यक्षपदासाठी अर्ज करणार की नाही, हे 27 ऑगस्ट रोजी स्पष्ट होईल.

जय शाह अर्ज करणार? (Jay Shah to be ICC President?)

जय शाह हे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सर्वात मोठे दावेदार आहेत, असं सांगण्यात येत आहे. जय शाह यांनी 2019 मध्ये बीसीसीआय सचिव म्हणून पदभार स्वीकारला आणि 2025 मध्ये त्यांना या पदावर 6 वर्षे पूर्ण होतील. जय शाह हे सध्या आयसीसीमध्ये आर्थिक आणि व्यावसायिक प्रकरणांचे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे शहा यांचे सर्व 16 मतदान सदस्यांशी चांगले संबंध आहेत.

जय शाह इतिहास रचणार?

जय शाह वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी सर्वात तरुण आयसीसी अध्यक्ष बनून इतिहास रचू शकतात. जय शाह यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे भारतीय आहेत ज्यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले आहे.

आयसीसी अध्यक्षांच्या कार्यकाळात बदल-

आयसीसी अध्यक्षांच्या कार्यकाळात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी एखादी व्यक्ती तीन वेळा अध्यक्ष होऊ शकत होती आणि प्रत्येक कार्यकाळ 2 वर्षांसाठी होता. परंतु नवीन नियमांनुसार, एखादी व्यक्ती दोनदा अध्यक्ष होऊ शकते आणि प्रत्येक कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास ते या पदावर 3 वर्षे राहतील.

2009 मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनमधून एन्ट्री-

जय शाहने 2009 मध्ये क्रिकेट प्रशासनात एन्ट्री घेतली होती. त्याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद सांभाळत होते. त्यानंतर 2015 साली जय शाह बीसीसीआयमध्ये सहभागी झाले आणि सप्टेंबर 2019 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले.

संबंधित बातमी:

एका षटकात 39 धावा ठोकल्या, गोलंदाजाला धू धू धुतला; टी-20 मध्ये नवीन विश्वविक्रम, पाहा Video

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
IPL 2026 Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
BCCI Naman Awards : BCCIची मोठी घोषणा! अवॉर्ड्समध्ये नवीन चेहरे चमकले, कोणत्या खेळाडूंना मिळाला पुरस्कार?
BCCIची मोठी घोषणा! अवॉर्ड्समध्ये नवीन चेहरे चमकले, कोणत्या खेळाडूंना मिळाला पुरस्कार?

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
Embed widget