एका षटकात 39 धावा ठोकल्या, गोलंदाजाला धू धू धुतला; टी-20 मध्ये नवीन विश्वविक्रम, पाहा Video
39 Runs In One Over In T20 International: एका षटकात 39 धावा करत नवीन विश्वविक्रम नोंदवण्यात आला आहे.
39 Runs In One Over In T20 International: टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये एक नवीन विश्वविक्रम झाला आहे. आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात केवळ 36 धावा झाल्या होत्या. मात्र आता एका षटकात 39 धावा करत नवीन विश्वविक्रम नोंदवण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 च्या एका षटकात 39 धावा... हे अशक्य वाटत असले तरी ते शक्य झाले. एका षटकात 39 धावा करत युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, दीपेंद्र सिंग आयरी आणि रोहित शर्मा/रिंकू सिंग) यांचा विक्रम मोडला. हा पराक्रम सामोआचा फलंदाज डॅरियस व्हिसरने केला आहे.
Most runs in an over in men's T20Is:
— Nic Savage (@nic_savage1) August 20, 2024
39 — Darius Visser 🇼🇸 vs VAN, '24
36 — Yuvraj Singh 🇮🇳 vs ENG, '07
36 — Kieron Pollard 🏝️ vs SL, '21
36 — R Sharma/R Singh 🇮🇳 vs AFG, '24
36 — DS Airee 🇳🇵 vs QAT, '24
36 — Nicholas Pooran 🏝️vs AFG, '24@FoxCricket https://t.co/vLXnpZhLZ1
एका षटकात 39 धावा ठोकल्या-
पुरुषांच्या टी-20 विश्वचषक उप-प्रादेशिक पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता A 2024 मध्ये घडला, जिथे सामोआचा फलंदाज डॅरियस व्हिसरने एका षटकात 6 षटकारांसह एकूण 39 धावा केल्या. यामध्ये 6 षटकार आणि 3 धावा नो-बॉलच्या माध्यमातून करण्यात आला. अशा प्रकारे एका षटकात डॅरियस व्हिसरने 39 धावा केल्या.
षटकात नेमकं काय घडलं?
षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर डॅरियस व्हिसरने वानुआटूच्या निपिकोवर सलग तीन षटकार ठोकले. त्यानंतर चौथा चेंडू नो बॉल होता, परिणामी 1 धाव झाली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर डॅरियसने आणखी एक षटकार ठोकला. त्यानंतर ओव्हरचा पाचवा चेंडू डॉट होता. यानंतर सहावा चेंडू नो बॉल होता, ज्यावर एक धाव आली. पुढचा चेंडू पुन्हा नो बॉल होता, ज्यावर षटकार मारला गेला आणि शेवटच्या फ्री हिट बॉलवर षटकार टोलावला. अशाप्रकारे एका षटकात 39 धावा केल्या.
पाहा संपूर्ण व्हिडीओ-
View this post on Instagram
डॅरियस व्हिसरने शतकी खेळी-
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सामोआ संघ 20 षटकात 174 धावांवर सर्वबाद झाला. डॅरियस व्हिसरने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 62 चेंडूत 5 चौकार आणि 14 षटकारांच्या मदतीने 132 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना वानुआटू संघ 20 षटकात 164/9 धावाच करू शकला.
संबंधित बातमी:
रिंकू सिंह विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणार?; मेगा लिलावाआधी केलं मोठं विधान
आता झहीर खान गौतम गंभीरची जागा घेणार?; अहवालातून धक्कादायक खुलासा