IND vs BAN : बुमराहला सुट्टी; 'या' खेळाडूला मिळणार संधी, कानपूर कसोटीसाठी भारताचा मोठा गेम प्लॅन तयार?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूर येथे होणार आहे. जसप्रीत बुमराहला या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना संधी मिळू शकते.
India vs Bangladesh 2nd Test Jasprit Bumrah To Be Rested : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे. चेन्नई कसोटीत टीम इंडिया 3 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरली होती. त्यामुळे चाहते थोडे आश्चर्यचकित झाले होते, पण लाल मातीच्या खेळपट्टीमुळे भारताने हा निर्णय घेतला होता. ज्यावर फक्त वेगवान गोलंदाजांनी जास्त विकेट घेतल्या. आता कानपूर कसोटीत टीम इंडियाचा गेम प्लॅन थोडा बदलू शकतो.
बुमराहला मिळणार विश्रांती
चेन्नई कसोटीत दोन्ही संघ लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळले, जे वेगवान गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरले. दुसरीकडे, आता कानपूर कसोटीत काळ्या मातीची खेळपट्टी असणार आहे, ज्यात फिरकीपटूंचे वर्चस्व पाहिला मिळणार आहे. अशा स्थितीत टीम इंडिया तिसऱ्या फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरू शकते.
दुसरीकडे, संघ व्यवस्थापन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देऊ शकते. कारण यानंतर टीम इंडियाला न्यूझीलंडसोबत तीन टेस्ट आणि ऑस्ट्रेलियासोबत पाच टेस्ट खेळायच्या आहेत, ज्यासाठी टीम मॅनेजमेंटला बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त हवा आहे. चेन्नई कसोटीच्या दोन्ही डावांसह बुमराहने एकूण 21 षटके टाकली होती.
कुलदीप की अक्षर?
जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून संधी मिळू शकते. मात्र, दुसऱ्या कसोटीत खेळण्याबाबत कुलदीप यादवचा वरचष्मा दिसत आहे. याआधी कुलदीपने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 19 विकेट घेतले होते. दुसरीकडे, टीम इंडियाकडे अश्विन आणि जडेजाच्या रूपाने दोन उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यामुळे अक्षर पटेलचे स्थान स्पष्ट दिसत नाही.
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे कर्णधार, श्रेयस अय्यर अन् शार्दुल ठाकूरची संघात एन्ट्री