Kanpur Pitch 2nd Test : लाल की काळी माती, IND vs BAN मधील दुसऱ्या कसोटीत कशी असेल खेळपट्टी? रिपोर्टमध्ये खुलासा
बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला. टीम इंडियासाठी रविचंद्रन अश्विनने शतक ठोकले आणि 6 विकेट्सही घेतल्या. तो संघासाठी सर्वात मोठा हिरो ठरला.
India vs Bangladesh 2nd Test Kanpur Pitch : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिला सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत आधीच 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत भारतीय संघाने 515 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 234 धावांवरच ऑलआऊट झाला. रविचंद्रन अश्विनसमोर बांगलादेशचे फलंदाज टिकू शकले नाहीत आणि बाद झाले.
सपाट खेळपट्टीवर बाउन्स असणार कमी
ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, दुसऱ्या टेस्टसाठी कानपूरची खेळपट्टी काळ्या मातीची असेल. ग्रीन पार्कची खेळपट्टी सपाट असेल, कसोटी सामना जसजसा पुढे जाईल तसतसा कमी बाउन्स मिळले, असे मानले जाते. त्यामुळे ही खेळपट्टी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. कानपूरची संथ खेळपट्टी लक्षात घेता दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्पिनर खेळवणार याची दाट शक्यता आहे. एकतर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल प्लेइंग इलेव्हनमध्ये येऊ शकतात.
चेपॉकमध्ये लाल मातीमुळे दोन्ही संघांच्या फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांना चांगलीच बाउन्स मिळाला, तर तिकडे फारसे वळण नव्हते. तरीही, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने भारतासाठी चांगली कामगिरी केली. या दोघांनी बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या डावात एकूण 9 विकेट घेतल्या.
भारतीय संघ 2021 मध्ये कानपूरमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी ही टेस्ट अनिर्णित राहिली. आता तीन वर्षांनंतर टीम इंडिया पुन्हा कानपूरमध्ये कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. श्रेयस अय्यरने 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत पदार्पण केले होते. त्यानंतर पदार्पणातच शतक आणि अर्धशतक झळकावले. कानपूरच्या मैदानावर भारताने आतापर्यंत एकूण 23 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. 13 सामने अनिर्णित राहिले आहेत.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
हे ही वाचा -
बांगलादेशला धक्का; भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी दिग्गज खेळाडूला दुखापत