Jasprit Bumrah Captain : कॅप्टन बुमराह! 90 वर्षांच्या भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदाच वेगवान गोलंदाजाकडे कर्णधारपद
भारतीय क्रिकेटचं कर्णधार म्हणून एक वेगवान गोलंदाज म्हटलं तर तसं कपिल देव यांनी कर्णधारपद भूषवलं होतं, पण ते एक अष्टपैलू खेळाडूही असल्याने बुमराह हा पहिलाच वेगवान गोलंदाज आहे जो भारतीय कसोटी संघाचा कर्णधार असेल.
Team India Captain : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा (Indian Team) नवा कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तो उद्या अर्थात 1 जुलै रोजी इंग्लंड (England) संघाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्याची माहिती दिली असून एक विशेष गोष्ट यासोबत भारतीय क्रिकेटमध्ये घडली आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा वेगवान गोलंदाजाकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेटचं कर्णधार म्हणून एक वेगवान गोलंदाज म्हटलं तर तसं कपिल देव यांनी कर्णधारपद भूषवलं होतं, पण ते एक अष्टपैलू खेळाडूही असल्याने बुमराह हा पहिलाच वेगवान गोलंदाज आहे जो भारतीय कसोटी संघाचा कर्णधार असेल.
कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व करणारा 35 वर्षीय जसप्रीत बुमराह हा पहिलाच वेगवान गोलंदाज आहे, तर कपिल देव यांचा विचार केल्यास बुमराह दुसरा गोलंदाज म्हणू शकतो. मार्च 1987 मध्ये कपिल देव यांच्यानंतर एकाही वेगवान गोलंदाजानं कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं नेतृत्व केलेले नाही. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान बुमराहला भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून बढती देण्यात आली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत बुमराहनं संधी मिळाल्यास भारताचं कर्णधारपद स्वीकारण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. ज्यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटीपूर्वी रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झाल्यामुळे बुमराहला कर्णधारपद मिळालं आहे.
उद्यापासून रंगणार कसोटी सामना
मागील वेळी भारतीय संघाला 5 सामन्यांच्या कसोची मालिकेतील अखेरचा सामना कोरोनाच्या संकटामुळे खेळता आला नव्हता. हाच सामना या दौऱ्यात खेळवला जाणार आहे. 1 जुलै ते 5 जुलै दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात हा एकमेव कसोटी सामना पार पडणार आहे.
हे देखील वाचा-
Rishabh Pant : सेल्फी घ्यायला आले फॅन्स, पण ऋषभ पंतने केलं असं काही की सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
Ind vs Eng, 5th Test : इंग्लिश फोटोग्राफरनं मानले विराट कोहलीसह बीसीसीआयचे आभार, काय आहे नेमकं कारण?