Ishant Sharma : अखेर प्रतीक्षा संपली! इशांत शर्माची अचानक संघात एन्ट्री, थेट प्लेइंग-11 मध्ये मिळणार जागा
एकीकडे टीम इंडिया ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 साठी जोरदार तयारी करत आहे, तर दुसरीकडे बऱ्याच दिवसांपासून टीममधून बाहेर असलेल्या इशांत शर्मासाठी मोठी बातमी आली आहे.
Ishant Sharma Delhi squad for Syed Mushtaq Ali Trophy : एकीकडे टीम इंडिया ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 साठी जोरदार तयारी करत आहे, तर दुसरीकडे बऱ्याच दिवसांपासून टीममधून बाहेर असलेल्या इशांत शर्मासाठी मोठी बातमी आली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळणारा इशांत शर्मा बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात पुनरागमनाच्या शोधात होता पण अद्याप त्याला यश आलेले नाही. त्यामुळेच तो देशांतर्गत क्रिकेट जोमाने खेळत आहे.
दरम्यान, इशांत शर्माबाबत मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, इशांत शर्माला संघात स्थान मिळाले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या 24 सदस्यीय दिल्ली संघात इशांत शर्माचा समावेश करण्यात आला आहे. दिल्ली संघाची कमान लखनऊ सुपर जायंट्स म्हणजेच LSG स्टार फलंदाज आयुष बडोनीकडे सोपवण्यात आली आहे. यश धुल आणि अनुज रावत हे संघात आहेत. याशिवाय दिल्ली प्रीमियर लीग म्हणजेच डीपीएलच्या पहिल्या सत्रात एका षटकात सहा षटकार मारणाऱ्या प्रियांश आर्यलाही संघात स्थान देण्यात आले आहे.
टीम इंडियासोबत हर्षित राणा
वेगवान गोलंदाज हर्षित राणा सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात असल्याने त्याला संघात स्थान मिळालेले नाही. पर्थ येथे 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी राणा भारताच्या प्लेइंग-11 मधील तिसरा वेगवान गोलंदाज होण्याच्या शर्यतीत आहे. केवळ 10 प्रथम श्रेणी सामने खेळलेला हर्षित 140 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेग आणि चांगली उसळी घेण्याची क्षमता यासह सातत्याने चमकदार कामगिरी करत असल्याचे म्हटले जाते. त्याने मोठ्या दिग्गजांनाही प्रभावित केले आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी दिल्लीचा संघ : प्रियांश आर्य, अनुज रावत, आयुष बडोनी (कर्णधार), हिम्मत सिंग, मयंक गुसैन, मयंक यादव, जॉन्टी सिद्धू, इशांत शर्मा, यश धुल, सिमरजीत सिंग, वैभव कंदपाल, हर्ष त्यागी, प्रिन्स , हिमांशू चौहान, वंश बेदी, आर्यन राणा, अखिल चौधरी, ध्रुव कौशिक, सार्थक रंजन, सुयश शर्मा, दिग्वेश राठी, आयुष सिंग, प्रिन्स चौधरी, प्रणव रणवंशी.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामने कुठे होणार?
यावेळी क्रिकेट चाहते सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिओ सिनेमावर लाइव्ह पाहू शकतात. 23 नोव्हेंबर 2024 पासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. 15 डिसेंबरला अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेचे सामने एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू, विशाखापट्टणम, इंदूर, मुंबई, राजकोट, हैदराबाद येथे होणार आहेत.