IPL Trading : हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात जाण्याची शक्यता, चर्चा अखेरच्या टप्प्यात, पीटीआयच्या वृत्ताने खळबळ
Hardik Pandya IPL Mumbai : भारताचा T20 कर्णधार हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सला रामराम करत मुंबईची वाट पकडू शकतो.
Hardik Pandya IPL Mumbai : भारताचा T20 कर्णधार हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सला रामराम करत मुंबईची वाट पकडू शकतो. आयपीएल(IPL) लिलावापूर्वी 'ट्रेडिंग'मध्ये हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्तायत सामील होऊ शकतो. मुंबई इंडियन्सने या प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे आयपीएलची 'ट्रेडिंग विंडो' (खेळाडूंची देवाणघेवाण) बंद होईपर्यंत 26 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये याबाबतची चर्चा सुरु असल्याचे पीटीआयने वृत्त दिले आहे.
IPL trading: Hardik Pandya in talks to leave Gujarat Titans for Mumbai Indians
हार्दिक पांड्या सात आयपीएल हंगामात मुंबईच्या ताफ्यात होता. 2022 च्या हंगामापूर्वी हार्दिक पांड्याला 'रिलीज' करण्यात आले होते. हार्दिक पांड्या नवख्या गुजरात टायटन्समध्ये सामील झाला. त्यानंतर, हार्दिकने या नवीन आयपीएल संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दोनदा नेले. यामध्ये गुजरात संघानेही पदार्पणाच्या मोसमात विजेतेपद पटकावले.
गुजरात टायटन्समधील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या आयपीएलच्या सुत्रांनी पीटीआयला सांगितले की, हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा अखेरच्या टप्प्यात पोहचली आहे. हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप करारावर स्वाक्षरी न झाल्याने आताच काही निश्चित सांगता येणार नाही. दरम्यान, सध्या फ्रँचायझी संघांमध्ये खेळाडूंची देवाणघेवाण सुरु आहे. हार्दिक पांड्या मुंबईत दाखल झाल्यास त्याच्या जागी गुजरात संघात कोणता खेळाडू सामील होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
A BCCI source said - "Hardik Pandya has been in talks with Mumbai Indians since the last IPL got over. Hardik and MI reached the decision a couple of months before WC - The Gujarat Titans management & Hardik Pandya have had growing differences". (To TOI) pic.twitter.com/01MJFMBQm8
— CricketMAN2 (@ImTanujSingh) November 24, 2023
गुजरात टायटन्सला रामराम करत हार्दिक मुंबईत सामील झाल्यास, तो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार का? याबाबतही चर्चा सुरु झाली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच विजेतेपदे जिंकली आहेत. यासारखे काही प्रश्न उपस्थित आहेत, ज्यावेळी बीसीसीआयकडून अधिकृत माहिती समोर येईल, तेव्हाच चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, मुंबईने अद्याप जोफ्रा आर्चरला सोडण्याचा निर्णय घेतला आहे की नाही याची पुष्टी मिळालेली नाही. मुंबईने जोफ्रासाठी 8 कोटी रुपये खर्च केले होते. पण त्याला दोन आयपीएल हंगामात फक्त पाच सामने खेळता आले.
आणखी वाचा :
Jofra Archer: मुंबई इंडियन्सच्या संघात बदल निश्चित, आर्चरला दाखवणार बाहेरचा रस्ता