(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023: रवींद्र जाडेजा चेन्नईच्या संघाची साथ सोडणार? आयपीएल 2023च्या ऑक्शनपूर्वी महत्वाची माहिती
IPL 2023: रवींद्र जाडेजानं सीएसकेच्या संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय, अशा बातम्यांनाही वेग आलाय.
IPL 2023 Mini Auction: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाच्या (IPL 16) ऑक्शनची तारीख समोर आल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) सीएसकेसोबत राहणार की अन्य दुसऱ्या संघाशी जुडणार? अशा चर्चांना सुरुवात झालीय. रवींद्र जाडेजा त्यांच्याच संघाकडून खेळणार, असा दावा चेन्नई सुपरकिंग्डकडून वारंवार केला जातो. परंतु, रवींद्र जाडेजानं सीएसकेच्या संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय, अशा बातम्यांनाही वेग आलाय. आयपीएल 2023च्या ऑक्शनपूर्वी चेन्नईचा संघ जाडेजाला रोखण्यासाठी पूर्ण जोर लावेल, असंही म्हटलं जातंय.
इनसाइड स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, येत्या पाच ते सहा दिवसांत रवींद्र जडेजाच्या सीएसकेमध्ये कायम राहण्याबाबत स्थिती स्पष्ट होऊ शकते. सीएसके संघ व्यवस्थापन एका आठवड्यात रवींद्र जडेजाशी संपर्क साधेल. जडेजाशी संपर्क होऊ शकला नाही, तर त्याला मिनी ऑक्शनपूर्वी रिलीज केलं जाईल, असं सीएसकेच्या अहवालात दावा करण्यात आलाय.
...तर सीएसकेचा संघ जाडेजाला संघातून रिलीज करणार
सीएसकेच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, "रवींद्र जाडेजा आणि चेन्नईच्या संघात दुरावा निर्माण झालाय, याची सर्वांनाच कल्पना आहे. रवींद्र जाडेजा गेल्या काही महिन्यांपासून सीएसके मॅनेजमेन्टचा फोन कॉल्स किंवा मॅसेजचा रिप्लाय देत नाही. जाडेजाचं अजूनही सीएसकेसोबत लीगल कॉन्ट्रॉक्ट आहे. यामुळं संघ व्यवस्थापन त्याच्याशी अखेरचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, त्याच्याकडून प्रतिसाद न मिळल्यास चेन्नईचा संघ त्याला रिलीज करण्याची माहिती बीसीसीआयला देईल."
संघाच्या बजेटमध्ये वाढ
बीसीसीआयनं सर्व 10 आयपीएल संघांना जाहीर केलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिलाय. यासोबतच 16 डिसेंबरला बंगळुरूमध्ये मिनी लिलाव होणार असल्याचंही स्पष्ट झालंय. बीसीसीआयनंही संघांना खेळाडूंच्या खरेदीसाठी यावेळी 90 कोटींऐवजी 95 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्याची परवानगी दिली. मात्र, कायम ठेवलेल्या खेळाडूंचं शुल्कही या बजेटमधून कापलं जाईल. जर सीएसकेच्या संघानं रवींद्र जडेजाला सोडलं, तर नवीन खेळाडूंच्या खरेदीसाठी त्याचं बजेट 19.45 कोटी रुपये असेल. इतक्या पैशांतून चेन्नईचा संघ दोन-तीन चांगल्या खेळाडूवर बोली लावू शकतो.
रवींद्र जाडेजाची आयपीएल 2022 मधील कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं आठ पैकी सहा सामने गमावले. याशिवाय, कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या रवींद्र जाडेजाला या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं 10 सामन्यात 20 च्या सरासरीनं फक्त 116 धावा केल्या.तर, 7.51 च्या इकोनॉमी रेटनं फक्त पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्यानं चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
हे देखील वाचा-