T20 World Cup 2022: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वार्मअप सामना; नाणेफेक जिंकून कंगारूंचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
ICC T20 World Cup 2022: भारताचा टी-20 विश्वचषकातील प्रवास आजपासून सुरू होतोय. भारत विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं (Australia vs India) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
ICC T20 World Cup 2022: भारताचा टी-20 विश्वचषकातील प्रवास आजपासून सुरू होतोय. भारत विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं (Australia vs India) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं त्यांचे प्रमुख खेळाडू डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मॅथ्यू वेड आणि जोश हेझलवूड यांना विश्रांती दिलीय. या सामन्यापूर्वी सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्यात कर्णधार रोहित शर्माने त्याला संधी दिली नाही. भारतीय संघ वेगवान गोलंदाज हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंहसोबत मैदानात उतरत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात रोहित शर्मानं ज्या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिलीय, हे सर्व खेळाडू पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघाचा भाग असू शकतात. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी आपली रणनीती पूर्णपणे तयार असल्याचा रोहित शर्मानं आधीच दावा केलाय. एवढेच नाही तर ,रोहित शर्मानं आठवडाभरापूर्वी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंची नावेही फायनल केलीय. रोहित शर्माच्या निर्णयामुळं हेही स्पष्ट झालं आहे की, दिनेश कार्तिक टी-20 विश्वचषकात भारतासाठी यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका साकारताना दिसेल. तर, ऋषभ पंतला प्रतीक्षा करावी लागू शकते.
ट्वीट-
Australia have won the toss and elect to bowl first.
— BCCI (@BCCI) October 17, 2022
Follow the match here - https://t.co/3dEaIjz140 #INDvAUS #T20WorldCup pic.twitter.com/Js9ETposyf
भारताची प्लेईंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन:
आरोन फिंच (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिश, टीम डेव्हिड, अॅस्टन अगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन.
हे देखील वाचा-