एक्स्प्लोर

Jofra Archer: आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; मॅचविनर गोलंदाजानं सुरू केलाय सराव

ENG Vs SA : जोफ्रा आर्चरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात 9.1 षटकात 6 बळी घेत संघाला मालिकेत क्लीन स्वीप मिळण्यापासून वाचवलं आहे.

IPL 2023, Mumbai Indians : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चषक उंचावलेला संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली. त्यात त्यांनी 8 कोटींना घेतलेला जोफ्रा दुखापतीमुळे एकही सामना मुंबईकडून खेळलेला नाही. पण आता जोफ्रा पूर्णपणे फिट झाला असून तो यंदाच्या आयपीएलमध्ये नक्कीच मैदानात उतरेल. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (SA vs ENG) यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांची वनडे मालिका दक्षिण आफ्रिकेने 2-1 ने जिंकली असली तरी मालिकेतील तिसर्‍या सामन्यात जोफ्रा आर्चरने दमदार कामगिरी केली. त्याने सहा विकेट्स घेत जागतिक क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. त्याची मॅचविनिंग कामगिरी पाहिल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला नक्कीच मोठा दिलासा मिळाला असेल.

या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यातील पराभवानंतर इंग्लंड संघावर क्लीन स्वीपचा धोका निर्माण झाला होता. पण तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने कर्णधार जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांच्या शतकी खेळीमुळे 346 धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला जोफ्रा आर्चरच्या शानदार गोलंदाजीचा सामना करावा लागला. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 1 बळी घेतल्यानंतर जोफ्रा आर्चरला दुसऱ्या वनडेच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं नाही. यानंतर तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत जोफ्राने आपल्या गोलंदाजीची धार सर्वांना दाखवून दिली. सामन्यात जोफ्राने 9.1 षटकात एकूण 6 विकेट्स घेतले.

काय म्हणाला जोफ्रा?

सहा विकेट्स घेतल्यानंतर जोफ्रा आर्चरने सांगितले की, खूप दिवसांनी पुनरागमन करणं सोपं नाही.  आयपीएलच्या शेवटच्या हंगामात जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता आणि त्यानंतर आयपीएल 2023 हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स त्याच्या फिटनेसबद्दल खूप चिंतेत होते. मात्र, आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात जोफ्राने आपल्या शानदार गोलंदाजीने फिटनेस सिद्ध करण्यासोबतच मुंबई इंडियन्सला दिलासा दिला आहे.

मुंबईनं रिलीज केलेले खेळाडू

कायरन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंह, आर्यन जुयाल, बेसिल थंपी, डॅनियल सायम्स, फॅबियन ऍलन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिले मेरेडिथ, संजय यादव आणि टायमल मिल्स

लिलावात मुंबई इंडियन्सनं विकत घेतलेले खेळाडू : कॅमरुन ग्रीन (17.5 कोटी), नेहाल वढेरा (20 लाख), शम्स मुलानी (20 लाख), विष्णु विनोद (20 लाख), डुआन जेंसन (20 लाख), पीयूष चावला (50 लाख), झाई रिचर्डसन (1.5 कोटी), राघव गोयल (20 लाख).

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

JP Nadda on RSS : जे.पी. नड्डा यांचं आरआरएसबाबत मोठं वक्तव्य! दरेकर काय म्हणाले?Shantigiri Maharaj Statment : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा, शांतिगिरी महाराजांचा दावाJ P Nadda On Rss : आता भाजप सक्षम, जेपी नड्डा यांचं RSS वर मोठं वक्तव्य ABP MajhaABP Majha Headlines : 10 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News : पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
Horror Movies : 'हे' हॉरर चित्रपट अन् वेबसीरिज उडवतील तुमची झोप... अजिबात एकटे पाहू नका; अंगावर येतील शहारे
'हे' हॉरर चित्रपट अन् वेबसीरिज उडवतील तुमची झोप... अजिबात एकटे पाहू नका; अंगावर येतील शहारे
Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Shantigiri Maharaj : 'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
Kolhapur Crime : भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
Embed widget