एक्स्प्लोर

IND vs NZ, 3rd T20 : तुफान फलंदाजीनंतर, भेदक गोलंदाजी, निर्णायक सामन्यात भारताचा 168 धावांनी तगडा विजय, मालिका 2-1 ने खिशात

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी घेत 234 धावा स्कोरबोर्डवर लावल्या, ज्यानंतर अवघ्या 66 धावांत न्यूझीलंडला सर्वबाद करत 168 धावांच्या तगड्या फरकाने सामना जिंकला.

IND vs NZ, 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) पार पडलेल्या टी20 सामन्यात भारताने 168 धावांनी मोठा विजय मिळवत मालिकाही जिंकली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतानं 235 धावाचं तगडं लक्ष्य न्यूझीलंडसमोर ठेवलं. यावेळी भारताकडून युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलनं (Shubhman Gill) शानदार शतक झळकावलं आहे. त्याने 63 चेंडूत 126 धावा केल्या. ज्यानंतर गोलंदाजी कर्णधार हार्दिकनं 4 विकेट्स घेत इतर गोलंदाजाच्या मदतीनं न्यूझीलंडला 66 धावांत सर्वबाद करत सामना 168 धावांनी जिंकला. मालिकेतील पहिला सामना जरी भारतानं गमावला असला तरी दुसरा सामना 6 विकेट्सनी आणि आजचा सामना जिंकत मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. 

सर्वात आधी म्हणजे सामन्यात नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खास झाली नाही, सलामीवीर ईशान किशन 1 धाव करुन स्वस्तात तंबूत परतला. मग गिलसोबत राहुल त्रिपाठीनं स्फोटक खेळी केली. 44 धावा करुन राहुल तंबूत परतला. मग सूर्यकुमारही 24 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कॅप्टन पांड्यानं गिलसोबत डाव सावरला. पांड्या 30 धावा करुन बाद झाला पण तोवर गिलनं तुफान फटकेबाजी करत 54 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. त्याने सामन्यात 63 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकार ठोकत नाबाद 126 धावा केल्या. हुडानं 2 धावांचं योगदान देत भारताची धावसंख्या 234 पर्यंत नेली.

कॅप्टन पांड्या कमाल फॉर्मात

120 चेंडूत 235 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंड संघाला सुरुवातीपासून भारतीय संघानं धक्के देण्यास सुरुवात केली. आजची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक फायद्याची असल्यानं भारतीय पेसर्सनी तशीच कामगिरी करत अवघ्या 66 धावांत किवी संघाला सर्वबाद केलं. यावेळी सर्वोत्कृष्ट गोलदांजी कॅप्टन हार्दिकनं केली. त्यानं 4 षटकांत 16 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. याशिवाय अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलनं 35 धावांची झुंज दिली पण भारताने दिलेल्या विशाल लक्ष्यासमोर ही धावसंख्या फार कमी असल्याने सामना भारताने 168 धावांच्या तगड्या फरकाने जिंकला. दोन तगड्या संघामध्ये झालेल्या टी20 सामन्यातील हा सर्वात मोठा विजय आहे. याशिवाय श्रीलंकेनं 2007 साली केनिया संघावर 172 धावांच्या फरकाने विजय मिळवला होता.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ben Stokes : इंग्लंड क्रिकेट बोर्डानं बेन स्टोक्सला धडा शिकवला, नाईट क्लब वादानंतर कर्णधारपद गेलं, संघातून बाहेर काढलं
ECB नं बेन स्टोक्सला धडा शिकवला, नाईट क्लब वादानंतर कर्णधारपद गेलं, संघातून बाहेर काढलं
Vaibhav Sooryavanshi : कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन उतरणार 'वैभव'; कधी अन् कुठे होणार इंडिया ‘अ’चा पुढचा सामना? जाणून घ्या A टू Z
कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन उतरणार 'वैभव'; कधी अन् कुठे होणार इंडिया ‘अ’चा पुढचा सामना? जाणून घ्या A टू Z
Suryakumar Yadav Mumbai Indians : पोस्ट हटवल्या, एकमेकांना अनफॉलो केलं; सूर्यकुमार अन् हार्दिकमध्ये वाद, मुंबई इंडियन्सचे बडे खेळाडू संघ सोडणार?
पोस्ट हटवल्या, एकमेकांना अनफॉलो केलं; सूर्यकुमार अन् हार्दिकमध्ये वाद, मुंबई इंडियन्सचे बडे खेळाडू संघ सोडणार?
Pakistan Squad for Asian Games : बाबर, रिझवान, आफ्रिदी सगळेच OUT.... टीम इंडियानंतर पाकिस्तानचा संघ जाहीर! कर्णधारपदी नव्या शिलेदाराची घोषणा; पाहा पाकचा खतरनाक Squad
बाबर, रिझवान, आफ्रिदी सगळेच OUT.... टीम इंडियानंतर पाकिस्तानचा संघ जाहीर! कर्णधारपदी नव्या शिलेदाराची घोषणा; पाहा पाकचा खतरनाक Squad

व्हिडीओ

Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report
Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
Maharashtra Live blog updates: मेट्रोच्या कामादरम्यान लोखंडी पट्टी कोसळून नागरिक जखमी; मिरा-भाईंदर रोडवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मेट्रोच्या कामादरम्यान लोखंडी पट्टी कोसळून नागरिक जखमी; मिरा-भाईंदर रोडवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचे उमेदवार चार-चारवेळा फोन करतात, वसंत देशमुखांनी एक फोनही केला नाही; जानकरांपाठोपाठ अभिजीत पाटलांचाही विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
महायुतीचे उमेदवार चार-चारवेळा फोन करतात, वसंत देशमुखांनी एक फोनही केला नाही; जानकरांपाठोपाठ अभिजीत पाटलांचाही विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
Embed widget