![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Isha Negi : पंतच्या दमदार शतकानंतर भारताचा विजय, गर्लफ्रेंड ईशाही खुश, खास स्टोरी शेअर करत केला आनंद जाहीर
Rishabh Pant : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंतने शतक ठोकत भारताला जिंकवण्यात महत्त्वाची कामगिरी केली, ज्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरुच आहे.
![Isha Negi : पंतच्या दमदार शतकानंतर भारताचा विजय, गर्लफ्रेंड ईशाही खुश, खास स्टोरी शेअर करत केला आनंद जाहीर Indian wicketkeeper Rishabh Pant scored century in India vs England 3rd ODI his girlfriend Isha negi shares story of him Isha Negi : पंतच्या दमदार शतकानंतर भारताचा विजय, गर्लफ्रेंड ईशाही खुश, खास स्टोरी शेअर करत केला आनंद जाहीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/18/d8f381d36e79799fd3fb85f4a1bd5d8a1658155787_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rishabh Pant Girlfriend Story : भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतने (Rishabh Pant) अप्रतिम शतक ठोकलं. त्याने हार्दिक पांड्यासोबत केलेल्या शतकी भागीदारीमुळेच भारत जिंकला. या विजयानंतर पंतवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगी (Isha Negi) हिने देखील एक खास इन्स्टाग्राम स्टोरी ठेवत पंतचं कौतुक केलं आहे.
सामन्यात ऋषभ पंतने 113 चेंडूत नाबाद 125 धावा ठोकत अप्रतिम शतक लगावलं. ज्यानंतर त्याची गर्लफ्रेंड ईशाही सर्व भारतीयांप्रमाणे आनंदी झाली. तिने आपला आनंद इन्स्टाग्राम स्टोरीमधून जाहीर केला. तिने सामन्यातीस विनिंग मूमेंटचा व्हिडीओ स्टोरीला पोस्ट करत त्यावर,'चॅम्प ऋषभ पंत', असंही लिहिलं.
आयपीएल सामन्यावेळी दिसली होती ईशा
ईशा नेगी (Isha Negi) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) मागील काही वर्षांपासून एकमेंकाना डेट करत आहेत. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या एका सामन्यावेळी ईशा नेगी स्टेडिअममध्ये दिसली होती. तेथील तिचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. ईशा नेगी सोशल मीडियावर सक्रिय असते.. ती फोटो आणि व्हिडीओ चाहत्यासाठी पोस्ट करत असते. ऋषभ पंत मूळचा उत्तराखंडचा असला तरी त्याचं संपूर्ण बालपण आणि ट्रेनिंग दिल्लीत झालं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये पंत दिल्लीकडून खेळत आला आहे.
भारताचा 5 विकेट्सनी विजय
हार्दिक पांड्या ऋषभ पंतच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. परंतु, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्या जोडीनं संघाचा डाव सावरून भारताच्या विजयाचा पाया रचला. भारताकडून ऋषभ पंतनं 113 चेंडूत नाबाद 125 धावांची खेळी केली. तर, हार्दिक पंड्यानं 55 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)