एक्स्प्लोर

ENG vs IND: भारतानं इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली; हार्दिक पांड्या, ऋषभ पंत ठरले विजयाचे शिल्पकार

ENG vs IND: हार्दिक पांड्या (Hardik Pandya), ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा (England Vs India) पाच विकेट्सनं पराभव केला.

ENG vs IND: हार्दिक पांड्या (Hardik Pandya), ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा (England Vs India) पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. परंतु, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्या जोडीनं संघाचा डाव सावरून भारताच्या विजयाचा पाया रचला. भारताकडून ऋषभ पंतनं 113 चेंडूत नाबाद 125 धावांची खेळी केली. तर, हार्दिक पंड्यानं 55 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं. 

इंग्लंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारतानं पाच षटकात दोन विकेट्स गमावल्या. भारताचा सलामीवीर शिखर धवन एक तर, रोहित शर्मा 17 धावा करून माघारी परतला. विराट कोहलीला या सामन्यातही काही खास कामगिरी करता आली नाही, तो 17 धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारनं पंतसोबत संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तोही 16 धावांवर असताना बाद झाला. दरम्यान, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्यानं संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दोघांनी पाचव्या विकेट्ससाठी 115 चेंडूत 133 धावांची भागेदारी केली. मात्र, 36 व्या षटकात हार्दिक पांड्या बाद झाला. यानंतर पंतनं जाडेजासोबत सहाव्या विकेटसाठी 40 चेंडूत 56 धावांची भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला. ऋषभ पंतचं एकदिवसीय कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. रवींद्र जडेजानं 15 चेंडूत 7 धावा केल्या. इंग्लंडकडून रीस टोप्लीनं तीन, कार्स आणि ऑर्टननं प्रत्येकी एक- एक विकेट्स घेतली.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 45.5 षटकांत 259 धावांवर सर्वबाद झाला. भारताला एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आजच्या सामन्यात 260 धावांची गरज होती. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरनं सर्वाधिक 60 धावा केल्या. बटलरशिवाय जेसन रॉयनं 41 धावा, मोईन अलीनं 34 धावा , क्रेग ओव्हरटननं 32 धावा केल्या. तसेच बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोननं प्रत्येकी 27-27 धावांचं योगदान दिलं. भारताकडून हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत 7 षटकात 24 धावा देत 4 विकेट्स घेतले. हार्दिकच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. त्यांच्याशिवाय युजवेंद्र चहलनं तीन आणि मोहम्मद सिराजनं दोन तर, रवींद्र जडेजानं एक विकेट घेतली.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget