Babar Azam Record: विराटनं शुभेच्छा देऊन काही तास उलटले नाही, तोच बाबर आझमचा नवा पराक्रम!
PAK vs SL: पाकिस्तान आणि श्रीलंका (Pakistan Vs Sri Lanka) यांच्यात गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे.
PAK vs SL: पाकिस्तान आणि श्रीलंका (Pakistan Vs Sri Lanka) यांच्यात गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार बाबर (Babar Azam) आझमनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात शतक झळकावून बाबर आझमनं पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकच्या (Inzamam-ul-Haq) विक्रमाशी बरोबरी साधली आहे. कर्णधार म्हणून बाबर आझमनं कसोटी क्रिकेटमध्ये नववं शतक झळकावलं आहे.
कर्णधार म्हणून बाबर आझमनं 70 डावात नववं कसोटी शतक झळकावलं आहे. या कामगिरीसह बाबर आझमनं इंझमाम उल हकच्या विक्रमाशी बरोबरी साधलीय. इंझमाम उल हकच्या नावावर 131 डावात 9 शतक झळकावण्याची नोंद आहे. या यादीत मिसबाह- उल- हक तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 135 डावात अशी कामगिरी केलीय. त्यानंतर इमरान खाननं 136 डावात 6 शतक आणि अझर अलीनं 40 डावात 5 शतक ठोकली आहेत.
ट्वीट-
श्रीलंकेच्या भूमीवर शतक झळकावणारा पहिला पाकिस्तानी कर्णधार
बाबरने श्रीलंकेच्या भूमीवर शतक झळकावताच नवा इतिहास रचलाय. श्रीलंकेत कसोटी सामन्यात शतक झळकावणारा बाबर पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून बाबरचे हे नववं कसोटी शतक आहे. 204 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील त्याचं हे 25 वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. बाबरच्या शतकानंतरही पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात श्रीलंकेच्या धावसंख्येपेक्षा 4 धावांनी पिछाडीवर गेलाय. श्रीलंकेनं पहिल्या डावात 222 धावा केल्या. पण पाकिस्तानला पहिल्या डावात 218 धावाच करता आल्या.
2019 नंतर सर्वाधिक शतके
2019 नंतर सर्वाधिक शतक झळकावणारा बाबर आझम पहिला फलंदाज ठरलाय. या कालावधीत त्यानं 16 शतकं ठोकली आहेत. त्यानंतर जो रूट 16 शतक, रोहित शर्मा 13 शतक आणि जॉनी बेअरेस्टोच्या नावावर 11 शतकांची नोंद आहे.
हे देखील वाचा-