Hardik Pandya : पांड्या आणि धोनी बनले 'जय आणि वीरू', सोशल मीडियावर खास फोटो झाले व्हायरल
Hardik Pandya and MS Dhoni : हार्दिक पांड्याने एमएस धोनीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शनही हटके दिलं आहे.
![Hardik Pandya : पांड्या आणि धोनी बनले 'जय आणि वीरू', सोशल मीडियावर खास फोटो झाले व्हायरल Indian Cricketer Hardik Pandya shares photo with ms dhoni in sholay Bike See pics Hardik Pandya : पांड्या आणि धोनी बनले 'जय आणि वीरू', सोशल मीडियावर खास फोटो झाले व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/ae1f1d9bd71394f2ad4eb5c059d8adf41674724619263323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Team India : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे जो सध्या तुफान व्हायरल होत आहे. काही वेळातच या फोटोवर हजारो लाईक्स पडले असून अनेकजण रिशेअर देखील करताना दिसत आहेत.आतातर या फोटोला लाईक करणाऱ्या युजर्सची संख्याही लाखोंच्या घरात पोहोचली आहे. तर हा फोटो व्हायरल होण्यामागे दोन मोठी कारणे आहेत. पहिलं म्हणजे, या फोटोमध्ये हार्दिक हा कॅप्टन कूल एमएस धोनीसोबत दिसत आहे.धोनीचे मैदानाबाहेरचे फोटो सोशल मीडियावर क्वचितच पाहायला मिळतात तसंच हा फोटो प्रसिद्ध हिंदी सिनेमा शोलेच्या 'जय आणि वीरू' यांच्याप्रमाणे दोघांनी काढला आहे.
या फोटोमध्ये हार्दिक आणि धोनी एकाच बाईकवर बसले आहेत. जी शोले सिनेमामध्ये दिसली होती. जय म्हणजेच अमिताभ बच्चन आणि वीरू म्हणजेच धर्मेंद्र या अभिनेत्यांचा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक असलेल्या 'शोले'मधी लूकमध्ये दोघे दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने शोलेचा उल्लेखही केला आहे. त्याने लिहिले आहे, 'शोले-2 लवकरच येत आहे' ज्यामुळे हा फोटो अनेकजण लाईक आणि पुन्हा शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वीच पांड्यासोबतचा धोनीचा नाचतानाचा एक डान्स व्हिडीओही व्हायरल झाला होता.
पाहा हार्दिक पांड्याची खास इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक कर्णधार
हार्दिक पांड्या (Hardik Pandya Captain) गेल्या काही काळापासून भारतीय टी-20 संघाची धुरा सांभाळत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये आयर्लंडच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच भारतीय संघाचा T20 कर्णधार बनलेल्या हार्दिकने अलीकडेच नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेचा आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या T20 मालिकेचा कर्णधारपद भूषवलं आहे.या तिन्ही मालिकांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. आता तो पुन्हा एकदा न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत (IND vs NZ T20 Series) कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही मालिका उद्या अर्थात 27 जानेवारीपासून सुरू होत आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)