'T20 क्रिकेटर ऑफ द इयर' बनताच सूर्यकुमारनं रचला इतिहास, धोनी-द्रविडसारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान
Suryakumar Yadav Team India: सूर्यकुमार यादवची ICC पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे. T20 फॉरमॅटमध्ये हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
Suryakumar Yadav Team India : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर एक खास पुरस्कार मिळवला आहे. टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीमुळे सूर्याने टीम इंडियातही पक्क स्थान निर्माण केलं आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये तो स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यासोबतच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही आपली चुणूक दाखवली आहे. 2022 हे वर्ष सूर्यासाठी खूप चांगले ठरलं. त्यामुळेच आयसीसीने त्याला वर्षातील सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला आहे. हा पुरस्कार मिळताच त्याने एक खास इतिहास रचला आहे. T20 क्रिकेटमध्ये हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
𝗣𝗿𝗲𝘀𝗲𝗻𝘁𝗶𝗻𝗴 𝘁𝗵𝗲 𝗜𝗖𝗖 𝗠𝗲𝗻'𝘀 𝗧𝟮𝟬𝗜 𝗖𝗿𝗶𝗰𝗸𝗲𝘁𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗬𝗲𝗮𝗿 2️⃣0️⃣2️⃣2️⃣
— BCCI (@BCCI) January 25, 2023
Congratulations @surya_14kumar 👏🏻👏🏻#TeamIndia pic.twitter.com/YdgWWxvkAW
सूर्यकुमार यादवने क्रिकेटर ऑफ द इयर बनताच इतिहास रचला. ICC पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर बनणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. यासोबतच त्याने महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविड यांच्या यादीतही स्थान मिळवले आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये हा पुरस्कार मिळवणारा द्रविड हा पहिला भारतीय खेळाडू होता. दुसरीकडे, एकदिवसीय फॉरमॅटमध्ये हा पुरस्कार मिळवणारा धोनी पहिला भारतीय खेळाडू होता. धोनीला 2008 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. तर द्रविडला 2004 मध्ये हा किताब मिळाला होता. ज्यानंतर आता टी20 फॉरमॅटमध्ये हा पुरस्कार मिळवणारा सूर्या पहिला खेळाडू ठरला आहे.
द्रविडला कसोटी फॉरमॅटचा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला असून त्याच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो एक दिग्गज म्हणून ओळखला जातो. त्याने 164 कसोटी सामन्यांमध्ये 12288 धावा केल्या आहेत. यादरम्यान द्रविडने 5 द्विशतकं आणि 36 शतकं झळकावली आहेत. त्याने 63 अर्धशतकंही केली आहेत. त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 270 आहे. धोनीला हा पुरस्कार वनडे फॉरमॅटसाठी मिळाला आहे. धोनीच्या एकदिवसीय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याचीही कामगिरी अगदी दमदार राहिली आहे. त्याने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10773 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 10 शतकं आणि 73 अर्धशतकं केली आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 धावा आहे.
ICC क्रिकेटर ऑफ द इयर जिंकणारे पहिले भारतीय
- कसोटी - 2004 मध्ये राहुल द्रविड
- एकदिवसीय - एमएस धोनी 2008 मध्ये
- T20 आंतरराष्ट्रीय - सूर्यकुमार यादव 2022 मध्ये
हे देखील वाचा-