MS Dhoni Vintage Car : कॅप्टन कूलचं वाहनप्रेम कायम, व्हिंटेज कार लँड रोव्हर धोनीच्या ताफ्यात
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कार्स आणि बाईक्स असून त्याच्या ताफ्यात आता आणखी एका गाडी दाखल झाली आहे.
![MS Dhoni Vintage Car : कॅप्टन कूलचं वाहनप्रेम कायम, व्हिंटेज कार लँड रोव्हर धोनीच्या ताफ्यात Indian Cricket team Former captain MS Dhoni buys vintage car Land Rover 3 MS Dhoni Vintage Car : कॅप्टन कूलचं वाहनप्रेम कायम, व्हिंटेज कार लँड रोव्हर धोनीच्या ताफ्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/08/b7355c00fa3686dad275e213919e796b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MS Dhoni Vintage Car : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) वेगवेगळ्या बाईक्स आणि कार्स गोळा करण्याचा छंद असल्याचं साऱ्यानांच माहित आहे. त्याच्या फार्महाऊसवर त्याच्या वाहनांसाठी एक भव्य गॅरेज देखील आहे. अनेकदा याचे फोटो व्हायरल होत असतात. तर धोनीच्या हटके बाईक्सही आपण पाहिल्या आहेत. आता मात्र धोनीने एक व्हिटेंज कार लिलावात विकत घेतली आहे. बिग बॉय टॉईज (BBT) या कंपनीच्या ऑनलाईन लिलावात धोनीने व्हिटेंज कार लँन्ड रोव्हर 3 (Land Rover 3) विकत घेतली आहे. धोनीच्या या कारचे फोटोज सध्या सोशल मीडियावर (MS Dhoni New car Pics) व्हायरल होत असून त्याचे चाहते हे पोस्ट करत आहेत.
बिग बॉय टॉईज या प्रसिद्ध कार विकणाऱ्या कंपनीने त्यांच्या गुरग्राम येथील शोरुममध्ये विंटेज आणि क्लासिक कारचा ऑनलाइन लिलाव (Online Auction) आयोजित केला होता. कंपनीच्या म्हणण्यानुसार, लिलावात संपूर्ण भारतातील अनेक सेलिब्रिटींचा सहभाग होता. यावेळी कंपनीने रोल्स रॉयस, कॅडिलॅक, बुइक, शेवरलेट, लँड रोव्हर, ऑस्टिन, मर्सिडीज-बेंझ अशा 19 विशेष कार्स या लिलावात ठेवल्या होत्या. यातील लँन्ड रोव्हर 3 ही कार धोनीने विकत घेतली आहे. धोनीने घेतलेली ही कार 1970 ते 1980 च्या दशकात तयार करण्यात आली असल्याचं समोर येत आहे.
हे ही वाचा :
- Glenn Maxwell BBL Record: ग्लेन मॅक्सवेलचा धमाका, बीबीएलमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस, अवघ्या 41 चेंडूत ठोकलं शतक
- Virat Kohli in IND vs SA : कोहलीचं शतक हुकलं, पण सचिन तेंडुलकरचा 'तो' दमदार विक्रम मात्र मोडला
- Ind vs SA, 1st ODI: पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 31 धावांनी विजय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)