Ind vs SA, 1st ODI: पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 31 धावांनी विजय
Ind vs SA : एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला आहे. विराट कोहली, शिखर धवन आणि शार्दुल ठाकूर यांचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांना आपली कामगिरी करण्यात अपयश आलेय.
Ind vs SA, 1st ODI Highlights: एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला आहे. विराट कोहली, शिखर धवन आणि शार्दुल ठाकूर यांचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांना आपली कामगिरी करण्यात अपयश आलेय. पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा 31 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघाने दिलेल्या 297 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकांत आठ बाद 265 धावा करता आल्या. विराट कोहली आणि शिखर धवन यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण लागोपाठ विकेट पडल्यामुळे भारताचा डाव गडगडला.
शिखर धवनपाठोपाठ विराट कोहलीही बाद झाला. शिखर धवन आणि विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. शिखर धवनने ७९ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ५१ धावांची खेळी केली. राहुल, पंत, श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करण्यास अपयश आले. मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्या. अखेरच्या षटकांत शार्दुल ठाकूरने अर्धशतकी खेळी केली, पण विजय मिळवून देण्यास अपयश आले. शार्दुल ठाकूरने अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला ऑल आऊट होण्यापासून वाचवले.
दरम्यान, कर्णधार बवूमाने आणि रुसी व्हॅन डर डुसेन यांनी केलेल्या 204 धावांच्या भागिदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 296 धावा केल्या. कर्णधार बवूमा याने 143 चेंडूत 110 धावांची खेळी केली. तर रुसी व्हॅन डर डुसेन याने 129 धावांची तडकाफडकी खेळी केली. भारतीय संघाला विजयासाठी 297 धावांचे आव्हान देण्यात आले होते. भारताकडून बुमराहने दोन आणि अश्विनने एक विकेट घेतली. इतर गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले. भारतविरोधात पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. 68 धावांत 3 विकेट घेत भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर कर्णधर बवुमा आणि डुसेन यांनी अप्रतिम शतकं झळकावत संघाचा डाव सावरला. ज्यामुळे आफ्रिकेने 50 षटकांत 296 धावा केल्या.