एक्स्प्लोर
Advertisement
IND vs SA, 2nd ODI Highlights : श्रेयसचं दमदार शतक, ईशानची तुफान खेळी, भारताचा आफ्रिकेवर 7 गडी राखून विजय, मालिकेत 1-1 ची बरोबरी
IND vs SA, 2nd ODI Result : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे पार पडलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने आधी कसून गोलंदाजी करुन नंतर तुफान फलंदाजी करत 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. सोबत मालिकेतही 1-1 ने बरोबरी घेतली आहे.
IND vs SA, 2nd ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात रांचीमध्ये पार पडलेला दुसरा एकदिवसीय सामना (IND vs SA 2nd ODI) भारताने 7 गडी राखून जिंकला आहे. सामन्यात आधी कसून गोलंदाजी केल्यानंतर भारताने श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer Century) नाबाद शतकासह ईशान किशनच्या (Ishan Kishan) 93 धावांच्या जोरावर सामना जिंकला आहे. हा सामना जिंकत भारताने मालिकेतही 1-1 ची बरोबरी घेतली आहे.
Series leveled 1️⃣-1️⃣ 👏🏻👏🏻
— BCCI (@BCCI) October 9, 2022
A magnificent run-chase by #TeamIndia against South Africa to register a victory by 7️⃣ wickets in Ranchi! 🙌🏻
Scorecard ▶️ https://t.co/6pFItKAJW7 #INDvSA | @mastercardindia pic.twitter.com/cLmQuN9itg
सामन्यात सर्वात आधी दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर सलामीवीर डी कॉक आणि जनेमान मलान फलंदाजीला आले. डी कॉकला 5 धावांवर सिराजनं तंबूत धाडलं. मलानलाही शाहबाजनं स्वस्तात माघारी धाडलं. पण नंतर एडन मार्करमने रीझा हेंड्रीक्ससोबत मिळून दमदार अशी शतकी भागिदारी केली. रीझाने 74 तर मार्करमने 79 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर क्लासेनने 30 तर मिलरने नाबाद 35 धावांंचं योगदान देत संघाची धावसंख्या 278 पर्यंत नेली. ज्यामुळे आता भारताला विजयासाठी 50 षटकात 279 धावा करायच्या होत्या. यावेळी भारताकडून सिराजने सर्वाधिक 3 तर वॉशिंग्टन सुदंर, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
ईशानसह श्रेयसनं सावरला डाव, मिळवून दिला विजय
279 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात खास झाली नाही. कर्णधार शिखर धवन 13 धावा करुन पारनेच्या चेंडूवर बाद झाला. सलामीवीर शुभमनही 28 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर मात्र ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या युवा खेळाडूंनी तुफान फटकेबाजी करत भारताचा डाव सावरला. दोघांनी आपआपली अर्धशतकं पूर्ण करुन फटकेबाजी सुरुच ठेवली. पण तितक्यात अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यावर ईशान किशन 93 धावा करुन बाद झाला. त्यानंतर श्रेयसने आपला स्पीड वाढवला, त्याच्यासोबतीला संजूही आला. ज्यानंतर श्रेयसच्या नाबाद 113 आणि संजूच्या नाबाद 30 धावांच्या जोरावर भारताने सामना 7 विकेट्सने जिंकला.
हे देखील वाचा-
Shahbaz Ahmed: शाहबाज अहमदचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण; आयपीएल गाजवलं, आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दाखवणार दम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement