एक्स्प्लोर

Shahbaz Ahmed: शाहबाज अहमदचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण; आयपीएल गाजवलं, आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दाखवणार दम

India vs South Africa 2nd ODI: ऑलराऊंडर शाहबाज अहमद एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 247वा भारतीय खेळाडू ठरलाय...

India vs South Africa 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळला जातोय. रांची (Ranchi) जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स (JSCA International Stadium Complex) येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला मालिकेत आव्हान टीकवून ठेवण्यासाठी विजय मिळवणं आवश्यक आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या सामन्यात दोन्ही संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळाले. दरम्यान, शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारताचा युवा स्टार ऑलराऊंडर शाहबाज अहमदनं (Shahbaz Ahmed) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. यानंतर शाहबाज अहमद आहे तरी कोण? अशा चर्चा सुरू झाल्या. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शाहबाज अहमदनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. ऑलराऊंडर शाहबाज अहमद एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 247वा भारतीय खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या मागच्या हंगमात शाहबाजनं चमकदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

शाहबाज अहमद कोण आहे?
शाहबाज अहमद देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. त्यानं भारतीय ए संघाचंही प्रतिनिधित्व केलंय. शाहबाज हा स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. तो संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो प्रभावी ठरला आहे. शाहबाजनं प्रथम श्रेणी सामन्यांच्या 29 डावांमध्ये 1 हजार 41 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या नावावर 57 विकेट्सचीही नोंद आहे. शाहबाजनं लिस्ट ए मध्ये 26 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 662 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतक आणि दोन अर्धशतकांसह 14 विकेट्सची नोंद आहे. एवढेच नव्हे तर, त्यानं आयपीएलमध्येही 29 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 13 विकेट्स घेण्यासोबत 279 धावा केल्या आहेत.

द.आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur News : मामाच्या मुलीशी लग्न, घरगुती भांडण अन् वाद विकोपाला, पतीने स्वतःला संपवल्याची बातमी मिळताच पत्नी 'त्या' ठिकाणी पोहोचली अन्...; सोलापूर हादरलं!
मामाच्या मुलीशी लग्न, घरगुती भांडण अन् वाद विकोपाला, पतीने स्वतःला संपवल्याची बातमी मिळताच पत्नी 'त्या' ठिकाणी पोहोचली अन्...; सोलापूर हादरलं!
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर, ठाकरे गटाचा पाठिंबा, सुप्रिया सुळेंकडून अमित शाहांचं कौतुक; नेमकं काय घडलं?
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर, ठाकरे गटाचा पाठिंबा, सुप्रिया सुळेंकडून अमित शाहांचं कौतुक; नेमकं काय घडलं?
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 03 April 2025Chandrakant Khaire Full PC : उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाद मिटला पण दानवे माझं ऐकत नाही,खैरेचा नाराजीABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 03 April 2025Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : मामाच्या मुलीशी लग्न, घरगुती भांडण अन् वाद विकोपाला, पतीने स्वतःला संपवल्याची बातमी मिळताच पत्नी 'त्या' ठिकाणी पोहोचली अन्...; सोलापूर हादरलं!
मामाच्या मुलीशी लग्न, घरगुती भांडण अन् वाद विकोपाला, पतीने स्वतःला संपवल्याची बातमी मिळताच पत्नी 'त्या' ठिकाणी पोहोचली अन्...; सोलापूर हादरलं!
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर, ठाकरे गटाचा पाठिंबा, सुप्रिया सुळेंकडून अमित शाहांचं कौतुक; नेमकं काय घडलं?
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर, ठाकरे गटाचा पाठिंबा, सुप्रिया सुळेंकडून अमित शाहांचं कौतुक; नेमकं काय घडलं?
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
Sikandar Box Office Day 4: 'छावा'ला पछाडता पछाडता, स्वतःच गळपटला 'सिकंदर'; 100 कोटींचा टप्पा गाठताना नाकी नऊ
'छावा'ला पछाडता पछाडता, स्वतःच गळपटला 'सिकंदर'; 100 कोटींचा टप्पा गाठताना नाकी नऊ
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आरजे महावशची बॉयफ्रेंडबाबतची पोस्ट अन् युजवेंद्रचं फक्त 15 सेकंदांतच लाईक; नेटकऱ्यांनी विचारलं, तूच आमची पुढची वहिनी?
आरजे महावशची बॉयफ्रेंडबाबतची पोस्ट अन् युजवेंद्रचं फक्त 15 सेकंदांतच लाईक; नेटकऱ्यांनी विचारलं, तूच आमची पुढची वहिनी?
Embed widget