एक्स्प्लोर

India vs England 3rd odi | टीम इंडिया शेवटच्या सामन्यात गेम प्लान बदलणार?

गोलंदाजीत कुलदीपला इंग्लंडच्या खेळाडूंनी आठ षटकार लगावले, भारतीय गोलंदाजांमध्ये हे सर्वाधिक आहेत. दुसर्‍या सामन्यात कुलदीपने 84 आणि पहिल्या सामन्यात 64 धावा दिल्या.

IND vs ENG 3rd Odi Preview : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना आज पुण्यात खेळला जाईल. दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला 336 धावांनी मोठी धावसंख्या उभारुन देखील पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला नवीन रणनीती घेऊन मैदानात उतरावे लागेल.

टीम इंडियाला सर्वात मोठी अडचण म्हणजे दोन्ही सामन्यात इंग्लंडची सलामीची जोडी फोडणे लवकर शक्य झालं नाही. याशिवाय कुलदीप यादव आणि क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीमुळे भारताच्या अडचणीही वाढल्या. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्सने फिरकीपटूंवर जोरदार आक्रमण केलं आणि मोठी धावसंख्या उभारली.

मागील सामन्याएवढी रविंद्र जाडेजाची कमतरता भारतीय कर्णधार विराट कोहलीला कधीच जाणवली नसेल. गोलंदाजीत कुलदीपला इंग्लंडच्या खेळाडूंनी आठ षटकार लगावले, भारतीय गोलंदाजांमध्ये हे सर्वाधिक आहेत. दुसर्‍या सामन्यात कुलदीपने 84 आणि पहिल्या सामन्यात 64 धावा दिल्या. त्याच वेळी क्रुणालने सहा षटकांत 12 च्या सरासरीने 72 धावा दिल्या. अशा परिस्थितीत लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना संधी मिळू शकते. चहल सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला तरी कोहलीकडे पर्याय नाही.

विराट कोहलीकडून शतकाची अपेक्षा

फलंदाजी करताना 336 धावसंख्या खराब नव्हती, परंतु फलंदाजीच्या शैलीत बदल आवश्यकता आहे. शेवटच्या 15 षटकांत वेगवान खेळण्याचा भारतीय संघाला आत्मविश्वास आहे.  परंतु वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडने दाखवून दिलं आहे की सुरुवातीपासूनच उपयुक्त खेळपट्टीवर आक्रमण करणे योग्य असते.

कर्णधार कोहलीने दोन्ही सामन्यात अर्धशतक झळकावले आहे, पण आजच्या त्याने शतक ठोकणे अपेक्षित आहे. कोहलीने ऑगस्ट 2019 मध्ये शेवटचे वनडे शतक झळकावले आहे. हार्दिक फिनिशरच्या भूमिकेत असेल पण नुकत्याच संपलेल्या टी - 20 मालिकेशिवाय त्याने अजून बॉलिंग केलेली नाही. टीम मॅनेजमेंटला याचा विचार करावा लागेल.

वेगवान गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार याच्यासह यॉर्कर टाकणारा टी नटराजनला मैदानात उतरवले जाऊ शकते. तसे, शार्दुल ठाकूर फॉर्ममध्ये आहे, परंतु जर त्याला विश्रांती दिली गेली तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यासाठी संधी आहे.

दुसरीकडे इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला आहे. बेन स्टोक्स फॉर्ममध्ये आल्यामुळे इंग्लंडला दिलासा मिळाला आहे. इंग्लंड संघात सॅम बिलिंग्ज शेवटच्या सामन्यात पुनरागमन करू शकतो. दुखापतीमुळे बिलिंग्जला दुसर्‍या वनडे सामन्यातून बाहेर होता. डेव्हिड मलानच्या जागी प्लेईंग 11 मध्ये बिलिंगचा समावेश असण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget