IND vs AUS, 3rd ODI : भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी आजवरच्या इतिहासावर एक नजर, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजवर तब्बल 145 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं आहे.
![IND vs AUS, 3rd ODI : भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी आजवरच्या इतिहासावर एक नजर, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड India vs Australia 3rd ODI know head to head record know details IND vs AUS, 3rd ODI : भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी आजवरच्या इतिहासावर एक नजर, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/70501b99f9014cdd282aebfabb1c3f3e1679407878695323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs Australia, 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs AUS) आज (22 मार्च) दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघ चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर एकमेंकांशी भिडतील. मालिकेतील पहिला सामना भारतानं तर दुसरा ऑस्ट्रेलियानं जिंकल्यामुळे मालिका सध्यातरी 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणारा संघ मालिका देखील जिंकणार आहे. दोन्ही संघाकडे आज मालिकाविजयाची संधी असल्यामुळे आज एक रंगतदार सामना पाहायला मिळू शकतो. तर आजच्या या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाता आजवरचा एकमेंकाविरुद्धचा एकदिवसीय सामन्यांतील इतिहास जाणून घेऊ...
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आतापर्यंत तब्बल 145 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता ऑस्ट्रेलियाचं पारडं कमालीचं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. कारण 145 पैकी 81 सामने ऑस्ट्रेलियानं जिंकले असून भारतीय संघाला 54 सामने जिंकण्यात यश आलं आहे. याशिवाय दोघांमधील एकूण 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.
चेपॉकची खेळपट्टी कशी असेल?
एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी सामान्यत: मर्यादीत षटकाटच्याा क्रिकेटमध्ये फिरकीपटूंसाठी अनुकूल असते. तसंच वेगवान गोलंदाज आणि फलंदाजांना ही समान मदत करते. उद्या (22 मार्च) होणाऱ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाजांना याठिकाणी चांगला स्विंग आणि सीम मिळेल असं म्हटलं जात आहे.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा
सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1 या चॅनेलवर दुपारी 1.00 वाजता सुरु होईल. तसंच या सामन्याचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार या अॅप आणि वेबसाइटवरुन पाहता येईल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)