आजी-माजी कर्णधार रिलॅक्स मूडमध्ये, इंग्लंडच्या बाजारात केली खरेदी, चाहत्यांसोबत काढले फोटो
India England tour : टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. प्रमुख खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाले आहे. गेल्यावर्षी रद्द झालेला कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहचलाय.
India England tour : टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. प्रमुख खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाले आहे. गेल्यावर्षी रद्द झालेला कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहचलाय. या दौऱ्यात भारतीय संघ टी 20 आणि एकदिवसीय सामन्याची मालिकाही खेळणार आहे. पुढील महिन्यात भारतीय संघ इंग्लंडबरोबर दोन हात करणार आहे. त्यापूर्वी भारतीय खेळाडू रिलॅक्स मूडमध्ये असल्याचे दिसले. भारतीय संघाचे आजी आणि माजी कर्णधार इंग्लंडमध्ये शॉपिंगमध्ये करताना दिसले. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, जसप्रीत बुमराह, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा. मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी आणि केएस भारत आणि कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडला गेले आहेत.
Cute little fans clicked picture with Virat Kohli in the Yesterday's practice sessions. pic.twitter.com/s1ykePyxTX
— CricketMAN2 (@ImTanujSingh) June 19, 2022
भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली इंग्लंडमध्ये शॉपिंग करताना दिसले. त्यांचे इंग्लंडमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. विराट आणि रोहित यांनी चाहत्यांसोबत फोटोही काढलेत. एजबॅस्टन येथे एक ते पाच जुलै यादरम्यान कसोटी सामना होणार आहे. त्यापूर्वी भारतीय खेळाडू रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत.
A fan clicked picture with both Virat Kohli and Rohit Sharma in London. pic.twitter.com/ozdhIHo8lH
— CricketMAN2 (@ImTanujSingh) June 19, 2022
अनुभवी खेळाडूशिवाय भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरोधात टी 20 मालिका खेळत आहे. त्यानंतर आर्यलँडविरोधात दोन टी 20 सामने होणार आहे. या संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. इंग्लंडविरोधातील मालिकेपूर्वी भारतीय संघ 24 जूनला लीसेस्टशर विरुद्ध 4 दिवसीय सराव सामना खेळणार आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारिख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.